

नाशिक : नाशिक परिक्षेत्रामधील नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील बारा नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. तर कार्यकाळ पूर्ण करणार्या पोलिस उपनिरीक्षकांसह काही नि:शस्त्र उपनिरीक्षकांच्याही विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
नाशिक परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांकडून विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करीत बदली करण्यात आल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील निरीक्षक सारिका आहिरराव, अहिल्यानगरमधून भगवान मथुरे, समाधान नागरे यांची नाशिक ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघा निरीक्षकांनी याआधीही नाशिक ग्रामीणमध्ये सेवा बजावली आहे. तर नाशिक ग्रामीणचे हेमंतकुमार भामरे यांची नंदुरबार येथे, अरुण धनवडे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगरचे यशवंत बाविस्कर, जळगावचे नागेश मोहिते यांची, तर नंदुरबार येथील भरत जाधव यांची नाशिक ग्रामिण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. तसेच परजिल्ह्यातून 29 उपनिरीक्षकांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील दहा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्चना तोडमल, मोहित मोरे, संजय वाघमारे, सुदर्शन आवारी, आजिनाथ कोठाळे, प्रवीण उदे, अजय कौटे, कांचन भोजणे, सचिन चौधरी, विजयकुमार कोठावळे यांची अहिल्यानगर, जळगाव, धुळे पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणमधील नि:शस्त्र उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, रामहरी खेडकर, बाजीराव सानप, भरत धुमाळ, किशोर गावडे यांची विनंतीनुसार अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.