

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रचार सभांचा श्रीगणेशा ते उत्तर महाराष्ट्रातून करणार असून धुळे आणि नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत. धुळ्याची सभा आवरताच दुपारी मोदी नाशिकमध्ये दाखल होणार आहे.
तपोवन परिसरातील मोदी ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा पार पडेल. दरम्यान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून समर्थ समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन सभेच्या मंचावरील फलकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. वर्षभरात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी नाशिकला येत असून आज नमो भारत रॅपिड ट्रेन आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन कॉरीडरची ते भेट देण्याची शक्यता आहे.