Nashik HAL Vendor Development | 'एरोस्पेस' उत्पादनांसाठी 300 उद्योजक उत्सुक

Nashik HAL Vendor Development | आत्मनिर्भर मिशनला बळ : निमाच्या 'एचएएल व्हेंडर डेव्हलपमेंट मीट'चा समारोप
Nashik HAL Vendor Development
Nashik HAL Vendor Development
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देण्यासाठी आणि स्थानिक एमएसएमई उद्योगांना संरक्षण उत्पादन साखळीशी जोडण्याच्या उद्देशाने निमा आयोजित 'एचएएल व्हेंडर डेव्हलपमेंट मीट-२०२६'ला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसीय उपक्रमात सुमारे ३०० उद्योजकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी आवश्यक विमान व एरोस्पेस घटकांच्या उत्पादनासाठी नवीन उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Nashik HAL Vendor Development
Kolhapur Startups | कोल्हापूर १,०१९ स्टार्टअप्स‍सह राज्यात ‘टॉप १०’मध्ये

एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमान निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध घटक, उपघटक, मशीनिंग, फॅब्रिकेशन, टूलिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पोझिट्स आणि इतर उत्पादनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच व्हेंडर नोंदणी प्रक्रिया, गुणवत्ता निकष, प्रमाणपत्रे, तांत्रिक अपेक्षा आणि व्यवसाय संधी याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उद्योजकांनी एचएएलच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत, शंकांचे निरसन केले. अनेक उद्योगांनी एचएएलच्या पुरवठा साखळीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी एचएएलने विमानांच्या सुट्या भागांचे प्रदर्शन भरविले होते.

निमा अध्यक्ष आशिष नहार म्हणाले की, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमामुळे अनेक उद्योजक नवीन उत्पादन सुविधा उभारून एचएएलसारख्या देशातील अग्रगण्य संरक्षण संस्थेचे अधिकृत पुरवठादार होऊ शकतील. यामुळे रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि प्रदेशाच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळेल.

Nashik HAL Vendor Development
IIT Bombay startups | फ्रान्समध्ये झळकणार मुंबई आयआयटीचे १६ स्टार्टअप्स

कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील एमएसएमई, अभियांत्रिकी उद्योग, स्टार्टअप्स आणि उद्योजकांची उपस्थिती होती. संरक्षण उत्पादन क्षेत्रात नाशिकला महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी निमा उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, एमएसएमई कमिटी चेअरमन दीपाली चांडक, मंगेश गांधी, प्रीतम बागूल, जयदीप राजपूत, अनिल मंत्री, सी. एस. सिंग, आशिष चांडक आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news