Nashik News | मेशी शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिला ठार

शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
Nashik News Woman killed in attack by ferocious animal in Meshi Shivara
मेशी शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिला ठारpudhari photo
Published on: 
Updated on: 

मेशी : मेशी शिवारात अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली. कमळाबाई सुपडू शिरसाठ (६१) असे मयताचे नाव आहे.

याबाबतवृत्त असे की, मेशी शिवारातील शेतात सुपडू गणपत शिरसाठ हे पत्नीसमवेत राहतात. शनिवारी दुपारी ते आपल्या मुलीकडे दहिवड येथे गेले हाेते. रात्री तेथेच मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी परतले. त्यांनी बाहेरून पत्नीला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. ते घरात गेले असता पत्नी कमळाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्याचे पाहून त्यांची पायाखालची वाळू सरकली. त्यांची आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. कमळाबाईंच्या मानेवर, छातीवर नखं लागल्याचे दिसून आले. घटनेबाबत वनरक्षक भुपेंद्र राठोड यांना कळविण्यात आले. राठोड यांसह वनक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, देवळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनेचा पंचनामा केला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार पार पडले.

Nashik News Woman killed in attack by ferocious animal in Meshi Shivara
धाकट्याने केला थोरल्या भावाचा खून; पैशाच्या कारणावरुन माळेगावात घडला प्रकार

परंतु, कुठेही ठसे नाहीत

स्थानिकांनी बिबट्याच्या हल्ल्याचा अंदाज वर्तविला. वन पथकाने मृतदेहाची पाहणी करत हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता मान्य केली. त्यानुसार परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न केला. मुरमाड जागा असून, तिथे असे कोणतेच ठसे मिळून आले नाहीत. त्यामुळे या घटनेविषयी कुतूहल निर्माण झाले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेचा उलगडा होणार आहे. दरम्यान, शिवारात दहशत पसरली आहे.

पिंजरा अन‌् ट्रॅम कॅमरे लावले

शेतकऱ्यांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले. त्यानुसार वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला तसेच ट्रॅम कॅमराही बसविण्यात आला आहे. त्यात कोणता हिंस्त्र प्राणी व हालचाली टिपल्या जातात, याकडे संपूर्ण शिवाराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news