Godavari Canal Lining | गोदावरी कालवा अस्तरीकरणाला कडाडून विरोध; खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया

Godavari Canal Lining | कार्यकारी अभियंता कार्यालयात खासदार वाजे यांच्यासह शेतकऱ्यांचा ठिया
Godavari Canal Lining
Godavari Canal Lining
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी उजवा तट कालवाच्या प्रस्तावित सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरणांमुळे शेतकरी, भूजल पुनर्मरण आणि ग्रामीण भागातील जलसुरक्षेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून या बाबतचा योग्य निर्णय घ्यावा, या मागणीसाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक गावांमधील शेतकऱ्यांसमवेत गोदावरी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया मांडला होता.

Godavari Canal Lining
Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गरजा विचारत घेऊन अस्तरीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. गोदावरी उजवा तट कालवाच्या देखभाल - दुरुस्तीच्या कामांतर्गत सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरण प्रस्तावित आहे.

मात्र, कालवाच्या परिसरातील अनेक गावांमध्ये विहिरी, बोअरवेल, कुपनलिका आणि इतर जलस्त्रोतांचे पुनर्मरण कालव्यातील पाण्याच्या झिरपण्यावर अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरसकट सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरण केल्यास भूजल पुनर्मरणावर परिणाम होण्याच्या तसेच शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेवर दुष्परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

स्थळपाहणी करून गावनिहाय निर्णयाचे आश्वासन

प्रशासनाने या चर्चेनंतर संबंधित कालवा परिसरात प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावनिहाय परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीत स्थानिक जलस्रोत, भूजल पुनर्मरणाची स्थिती, शेतीची पाण्याची गरज आणि अस्तरीकरणाची तांत्रिक आवश्यकता यांचा विचार केला जाईल.

त्यानंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी विचारविनिमय करून त्यांच्या सहमतीने योग्य toडगा काढण्याची भूमिका प्रशासनाने मांडली. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता, अस्तरीकरणाचे काम पुढे नेकू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

उपलब्धता यांचाही विचार शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक अभ्यास आणि स्थानिकांचे अनुभव यांच्या आधारावर निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खासदार वाजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना प्रत्येक गावातील परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अस्तरीकरण करण्याऐवजी गावनिहाय आवश्यकता तपासली जावी, अशी भूमिका मांडली. कोणत्या गावात किती अंतरापर्यंत सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरण आवश्यक आहे, कोणत्या भागात अस्तरीकरणाच्या भूजल पुनर्मरणावर परिणाम होऊ शकतो आणि कोणते पर्यायी उपाययोजना करता येतील, याबाबत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

सीमंतीनी कोकाटे यांची जलसंपदामंत्र्यांकडे धाव

गोदावरी उजवा तट कालवाच्या परिसरात सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरणामुळे भूजल पुनर्मरण, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कालव्याच्या देखभाल - दुरुस्तीला विरोध नसून, अस्तरीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वकष तांत्रिक अभ्यास करावा, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. कालवा परिसरात अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर शेती करतात. फळबागा, ठिबक सिंचन व पाइपलाइनसाठी त्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.

Godavari Canal Lining
Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

भूजल पातळीत घट झाल्यास सिंचन, शेतीचे उत्पन्न, पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता निवेदनात केली आहे. अस्तरीकरणाच्या संभाव्य परिणामांचा जलतज्ज्ञांमार्फत अभ्यास करावा, शेतकरी प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या हरकती व सूचनांचा विचार करावा. आवश्यक देखभाल - दुरुस्ती आणि सीमेंट क्राँक्रिट अस्तरीकरण या बाबींचा स्वतंत्रपणे विचार करून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news