

ठळक मुद्दे
कांद्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ
भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होणार : कांद्याला फटका
श्रीलंका सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी घेतला मोठा निर्णय
लासलगाव ( नाशिक ) : श्रीलंका सरकारने आजपासून कांद्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ करत 10 रुपये प्रति किलोवरून थेट 50 रुपये प्रति किलो इतके शुल्क लागू केले आहे. या निर्णयामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होणार असून, निर्यात व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
श्रीलंका मधील कांदा मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तेथील शेतकऱ्यांचा विचार करता कांदा आयात शुल्कात वाढ केल्याची माहिती निर्यातदारांकडून व्यक्त केली जात आहे.
श्रीलंका आयातदारांना पूर्वी भारतीय कांदा कमी दरात उपलब्ध होत होता. मात्र आता आयात शुल्क वाढल्यामुळे श्रीलंकेत भारताकडून निर्यात होणाऱ्या कांद्याला याचा फटका बसणार आहे
श्रीलंका सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.