NMC PG Diploma | वैद्यकीय शिक्षणात आता थेट एमडी-एमएस पदवी

NMC PG Diploma | पीजी, डिप्लोमा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने होणार बंद, डिप्लोमाऐवजी आता थेट पदवीधर
NMC PG Diploma
NMC PG DiplomaFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठा करणारा निर्णय नॅशनल मेडिकल कमिशनने जाहीर केला आहे. त्यानुसार देशभरातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे. यामुळे एक वर्षाने अभ्यासक्रम वाढणार आहे. मात्र, त्यामुळे डिप्लोमाऐवजी थेट आता पदवीधर होता येणार आहे. हा सर्वात मोठा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सरकारच्या नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही.

NMC PG Diploma
Campus to Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एआय, रोबोटिक्स आणि करिअर संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वैद्यकीय शिक्षणातील डिप्लोमा डिग्री डिप्लोमा व डिग्रीची कोणत्याही जागा कमी होणार नाही. त्यानंतर २०२७-२८ पासून कोणत्याही पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया होणार नाही. एनएमसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सध्या सुरू असलेले पीजी, डिप्लोमा अभ्यासक्रम एमडी आणि एमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांत रूपांतरित केले जातील.

त्यामुळे विद्यार्थ्यांना डिप्लोमाऐवजी थेट पदव्युत्तर पदवी मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळण्यास मदत होणार आहे. एनएमसीच्या मते, वैद्यकीय शिक्षणाचे जागतिक मानकीकरण करणे, विशेषज्ञ प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे, वैद्यकीय महाविद्यालयांतील उपलब्ध पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचा अधिक प्रभावी वापर करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

अनेक महाविद्यालयांत एकाच विषयासाठी पीजी, डिप्लोमा आणि एमडी-एमएस असे दोन्ही अभ्यासक्रम सुरू असल्याचे तसेच आवश्यक सुविधा असूनही काही संस्था केवळ डिप्लोमा अभ्यासक्रम चालवत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बदलाच्या अंमलबजावणीसाठी एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्डकडे (एमएआरबी) ऑनलाइन अर्ज करून संबंधित डिप्लोमा अभ्यासक्रमांचे एमडी किंवा एमएसमध्ये रूपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनाच या रूपांतरणास मान्यता दिली जाणार आहे. दरम्यान, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

NMC PG Diploma
Pudhari Campus to Career Seminar: रोबोटिक्‍स्‌ अन्‌ डिजिटल तंज्ञत्रानात करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षणात गुणवत्तावाढ, एकसमान शिक्षण प्रणाली आणि जागतिक निकषांनुसार विशेषज्ञ डॉक्टर तयार करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या पद्व्युत्तर समितीचे अध्यक्ष असताना या बदलाची संकल्पना मांडली होती. आता एनएमसीने त्याला अंतिम स्वरुप दिल्याचे त्यांनी नमूद केले.

हा अतिशय योग्य वर्षाचा अभ्यासक्रम निर्णय आहे. एक वाढल्यामुळे समाजाला उच्चशिक्षित डॉक्टर लाभणार आहे. त्याचबरोबर जे वैद्यकीय शिक्षणात नोकरी करणारे आहेत, त्यांना डिप्लोमानंतर वरिष्ठ पदांवर जाण्यासाठी मर्यादा होत्या. आता पदवी मिळणार असल्यामुळे त्यांनाही भविष्यात मोठ्या संधी मिळू शकतील.

- डॉ. सुधीर भामरे, अधिष्ठाता, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, आडगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news