Niphad Stray Dog : निफाड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा कहर; महिन्याला सुमारे 1,300 नागरिकांना लस

पिंपळगाव बसवंतला जखमी चार वर्षीय बालकाचा मृत्यू
Stray Dog
Stray DogPudhari News Network
Published on
Updated on

निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित बनले आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयातच महिन्याला ५०० ते ६०० नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येत असल्याचे या ठिकाणच्या नोंदींवरून समोर आले आहे.

तालुक्यातील अनेक भागांत वाढत्या मोकाट कुत्र्यांची मोंठ्या प्रमारात दहशत आहे. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे कुत्रा चालवल्यामुळे नागरिकांना लस घ्यावी लागत आहे. तालुक्यातील इतर प्रमुख आरोग्य केंद्रांमध्ये लासलगाव, पिंपळगाव बसवंत, ओझर, चांदोरी, सायखेडा या ठिकाणी महिन्याकाठी १०० ते १५० जखमी नागरिक उपचारासाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तालुक्याचा एकूण मासिक आकडा १,००० ते १,३०० इतका आहे. वर्षभरात हा आकडा तब्बल १२ ते १५ हजारांपर्यंत पोहोचत असल्याने भुटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांची डोकेदुखवा वाढविणारी ठरत आहे.

Stray Dog
Nashik Stray Dog Bite : पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने चिमुकल्याचा मृत्यू

पिंपळगावमध्ये चार वर्षीय बालकाचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांने चावा घेतल्याने पिंपळगाव बसवंत येथे कुंज गुप्ता या चार वर्षीय बालकाला तीन आठवड्यांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. चावा चेहऱ्यावर असल्याने विषाणूचा प्रसार वेगाने झाला. आणि उपचार सुरू असतानाही त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगावसह संपूर्ण तालुका हादरला आहे.

नागरिक त्रस्त- प्रशासन सुस्त

तालुक्यातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचे कळप मोकाट फिरत आहेत. सकाळ- संध्याकाळच्या वेळी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठा धोका निर्माण होत आहे. दुचाकीस्वारांच्या पाठलागाच्या घटनाही वाढल्या आहेत.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी

नागरिकांनी नगर परिषद आणि ग्रामपंचायतींनी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच परिस्थिती गंभीर झाली असून, योग्य पावले उचलली नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news