

नाशिक : महिनाभरापूर्वी श्वानाने चावलेल्या सहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरतरीनाथ हरी गजरे (६, रा. गंधर्वनगरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
भरतरीनाथ यास ४ जुलैला जेलरोड परिसरात पिसाळलेल्या श्वानाने डोक्यास चावा घेतला होता. त्याच्यावर त्यावेळी उपचारही करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान, बुधवारी (दि. ७) भरतरीनाथचा मृत्यू झाला.