

निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात मादी बिबट्याचा वावर वाढला.
कैलास शेळके यांच्या शेतात मादी बिबट्या तीन बछड्यांसह आढळून आली.
ग्रामस्थांच्या मदतीने दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश.
मादी बिबट्या व एक बछडा अद्याप फरार; ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू.
नागरिकांनी शेतात जाताना सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन.
Niphad Leopard News
निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात मादी बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कैलास शेळके यांच्या शेतात ही मादी बिबट्या तीन बछड्यांसह आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. मादी बिबट्या उसाच्या दाट शेतात पळून गेली, मात्र तिचे बछडे तिथेच अडकले होते. ग्रामस्थांच्या मदतीने दोन बछड्यांना पकडून जेरबंद करण्यात आले आहे.
मात्र एक बछडा आणि मादी बिबट्या अद्याप फरार असून वनविभाग ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवत आहे. मादी बिबट्या बिथरलेली असल्याने नागरिकांना शेतात जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.