Malegaon NEET Re Exam 2026 | पेपरफुटीनंतरची नीट पुनर्परीक्षा शांततेत

Malegaon NEET Re Exam 2026 | मालेगावी तीन केंद्रांमध्ये परीक्षा
NEET UG Re-Exam 2026
NEET UG Re-Exam 2026Pudhari
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

देशभर चर्चेत राहिलेल्या नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर रद्द करण्यात आलेली पुनर्परीक्षा रविवारी (दि. २१) मालेगावातील तीन केंद्रांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत पार पडली. तिन्ही केंद्रांमध्ये मिळून २,०५१ विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती.

NEET UG Re-Exam 2026
UPSC Prelims 2026 Nashik | यूपीएससी पूर्वपरीक्षेला 1,685 विद्यार्थ्यांची दांडी

मसगा महाविद्यालयात ७३१, महिला महाविद्यालयात ६०० आणि एटीटी हायस्कूलमध्ये ७२० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता.

तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी व स्कॅनिंग करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. सर्व केंद्रांमध्ये सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली परीक्षा प्रक्रिया पार पडली.

NEET UG Re-Exam 2026
NEET UG 2026 Retest: कडेकोट बंदोबस्तात नीट-यूजी 2026 पुनर्परीक्षा; पुण्यात परीक्षा सुरळीत

प्रश्नपत्रिका राष्ट्रीयीकृत बँकांच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षेपूर्वी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, तहसीलदार विशाल सोनवणे आणि नीटचे अधिकारी जी. एन. जोशी शिक्षा यांनी परीक्षा केंद्रांची बे, पाहणी करून तयारीचा आढावा घेतला होता. सदरामय काटेकोर सुरक्षा व्यवस्था, कठोर तपासणी आणि प्रशासनाच्या सतर्क देखरेखीमुळे पुनर्परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news