Simhastha Kumbh Mela 2027 | 'एनडीएमए' कडून कुंभमेळा तयारीचा दिल्लीत आढावा

Simhastha Kumbh Mela 2027 | गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, विशेष आपत्ती व्यवस्थापनासाठी सहकार्याची मागणी
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा 'एनडीएमए'तर्फे नवी दिल्लीमध्ये आयोजित उच्चस्तरीय बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण सहभागी झाले होते.

Nashik Kumbh Mela 2027
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तथा विभागप्रमुख डॉ. कृष्णा एस. वत्सा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. दिनेश कुमार असवाल तसेच महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

बैठकीदरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आणि नियोजनाचा आढावा सादर केला. यावेळी आपत्ती संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद नियोजन, संभाव्य दुर्घटना परिस्थिती, गर्दी व्यवस्थापन, गर्दीच्या उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण, स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचे कार्यान्वयन, घटना प्रतिसाद प्रणाली तसेच विविध विभागांतील समन्वय यंत्रणा आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गीय आणि अणुस्तरीय धोक्यांच्या तयारीसंदर्भात उपाययोजना, कुंभमेळा कालावधीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांची नियुक्ती, मोठ्या प्रमाणावरील आपत्कालीन परिस्थितींसाठी विशेष प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे यासंदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तांत्रिक मार्गदर्शन आणि धोरणात्मक सहकार्याची मागणी करण्यात आली. गर्दी व्यवस्थापन आणि यापूर्वीच्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांतील अनुभवांवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली.

Nashik Kumbh Mela 2027
Konkan Railway Monsoon Timetable | कोकण रेल्वेचा वेग मंदावणार !

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने समाधान व्यक्त केले. धोरणात्मक आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कुंभमेळा प्राधिकरणाकडून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि समन्वयपूर्ण व्यवस्था उभारण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य शासन आणि सर्व संबंधित विभागांशी समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news