Navratri Garba Look Trends | नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी नाशिकची तरुणाई सज्ज! 'कच्छ-वर्क' अन् 'ऑक्सिडाइज्ड' दागिन्यांची धूम

Navratri Garba Look Trends | नवरात्रोत्सवाचे वेध लागताच गरबा आणि दांडिया कार्यक्रमांसाठी तरुणाईची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे.
Navratri Garba Look Trends
Navratri Garba Look Trends
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाचे वेध लागताच गरबा आणि दांडिया कार्यक्रमांसाठी तरुणाईची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठेत पारंपरिक पोशाख उपलब्ध झाल्यामुळे स्टायलिश आणि हटके लूक करण्याकडे यंदा तरुणाईचा कल दिसत आहे. यामध्ये कच्छ-वर्कचे घागरे, वेलवेटचे पोशाख, निऑन शेड्स, भरजरी नक्षीकाम आणि ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा ट्रेंड सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

Navratri Garba Look Trends
Nashik Dam Water Level | नाशिक जिल्ह्यातील 26 धरणांचे दरवाजे बंद! नदीपात्रातील विसर्गाला अखेर पूर्णविराम

दरवर्षी नवरात्रोत्सवात पोशाखांच्या नव्या डिझाइन्स बाजारात दाखल होतात. यंदा मुलींसाठी शुभचिन्हे, पारंपरिक नक्षीकाम आणि कच्छ-वर्क असलेले घागरे विशेष आकर्षण ठरत आहेत. विविध रंगसंगती आणि वेलवेट कापडातील घागर्‍यांनाही तरुणाईकडून मोठी मागणी आहे. पोशाखाला उठाव देण्यासाठी ऑक्सिडाइज्ड दागिने, आकर्षक नेकलेस, कानातले आणि बांगड्यांचीही तरुणाईकडून खरेदी केली जात आहे.

पुरुषांच्या पोशाखांमध्येही यंदा विविध प्रयोग करण्यात आले आहेत. टर्बन-स्टाइल पगडी, केडिया-धोती सेट तसेच आकर्षक नक्षीकाम असलेल्या पारंपरिक पोशाखांना तरुणांची पसंती मिळत आहे. देवतांची चित्रे असलेल्या पगड्यांनाही मागणी असून, काही तरुणांनी गरबा कार्यक्रमासाठी महिनाभर आधीच पोशाखांचे बुकिंग केले आहे.

Navratri Garba Look Trends
Nashik Fodder Crisis | नाशिक जिल्ह्यावर चाराटंचाईचे सावट! खरीप कडबा आणि पेंढ्याचे उत्पादन घटण्याची भीती

कच्छ-वर्कच्या घागऱ्यांपासून टर्बन-स्टाइल पगड्यांपर्यंत नवनव्या ट्रेंडच्या पोशाखांना पसंती:

सोशल मीडियाचा 'फॅशन फंडा':

सोशल मीडियावरील रील्स आणि फॅशन ट्रेंडचा प्रभाव नवरात्रोत्सवाच्या पोशाखांवरही स्पष्टपणे दिसत आहे. गरबा खेळण्यासाठीच्या मैदानात आपला लूक सर्वांपेक्षा वेगळा दिसावा, यासाठी तरुणाईकडून सोशल मीडियावर नवनवीन डिझाइन्सचा शोध घेतला जात आहे. गडद रंगांबरोबर निऑन शेड्स, वेलवेट कापड आणि भरजरी नक्षीकाम यंदाच्या फॅशनमध्ये आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

भाडेतत्वावरील पोशाखांनाही मागणी:

नवरात्रोत्सवातील दरदिवशी वेगळा लूक करण्यासाठी पोशाख भाड्याने घेण्याकडेही तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे कमी कालावधीसाठी पोशाख वापरणाऱ्यांसाठी भाड्याने पोशाख घेण्याचा पर्याय सोयीचा ठरत आहे.

"महिलांमध्ये पारंपरिक ब्लाऊजऐवजी 'टॉप-घागरा' आणि 'फॅन्सी ब्लाऊज'ला पसंती मिळत आहे. लहान मुलांसाठी दोन महिन्यांच्या बाळापासून ते फ्री साइजपर्यंत विविध प्रकारचे पोशाख उपलब्ध आहेत. पुरुषांमध्ये 'धोती-केडिया' आणि 'घुंघरू घागरा' या पोशाखांना अधिक पसंती मिळत आहे. यंदा मखमली (वेलवेट) कापडावर भरजरी नक्षीकाम आणि शुभचिन्हांचे (मोटिफ्स) डिझाइन असलेल्या घागऱ्यांना मुलींची विशेष पसंती आहे."

— दर्शन परदेशी, विक्रेता

"रास-गरबा आणि दांडिया आता केवळ गुजरातपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. देशभरातील तरुणांमध्ये या कार्यक्रमांची लोकप्रियता वाढली आहे. पोशाखासाठी लागणारे साहित्य अहमदाबादहून मागवून सिंधूर येथील कारखान्यात सध्या सुरू असलेल्या ट्रेंडनुसार पोशाख तयार केले जातात. गेल्या १४ वर्षांपासून या व्यवसायात असल्यामुळे दरवर्षीच्या बदलत्या ट्रेंडचा अभ्यास करून त्यानुसार पोशाख उपलब्ध करून दिले जातात."

— समीर बोराडे, ड्रेस डिझायनर व विक्रेता

जोडप्यांसाठी 'मॅचिंग लूक':

गरबा आणि दांडिया कार्यक्रमासाठी जोडप्यांकडून मॅचिंग पोशाखांना विशेष पसंती दिली जात आहे. मुलींच्या घागऱ्यांशी रंगसंगती साधणारे केडिया किंवा कुर्ते तरुणांकडून निवडले जात आहेत. त्यामुळे जोडप्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मॅचिंग डिझाइन्सना मागणी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news