मालेगाव : शहर व तालुक्याला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. आगामी आठवड्यात २२ सप्टेंबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे. पितृपंधरवड्याचे अखेरचे पाच दिवस असल्याने महिला मंडळींसह सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी तसेच विविध स्वयंसेवी संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी नवरात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे. मूर्ती आरक्षण, मंडप, रोषणाई, डेकोरेशन यासाठीची लगबग सुरू झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने ग्रामीण भागातही उत्साहाची तयारी जोमाने असेल.
शहरातील पुरातन कॅम्प भागातील व रामसेतू पुलावरील देवी मंदिरात स्वच्छता, रंगरंगोटी व अन्य तयारी सुरू झाली आहे. कॅम्प, संगमेश्वर सटाणानाका, नववसाहत भागांत नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठा असतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाश्वभूमीवर व दीपावलीमुळे उत्सव मंडळांना खासगी आस्थापनांच्या फ्लेक्स जाहिराती तसेच राजकीय नेत्यांच्या वर्गणीचीही सोय होणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येथील लोढा भुवन परिसरातील गुरुदेव भक्तमंडळाचा गरबा दांडिया प्रसिद्ध आहे. याशिवाय काही क्लब, खासगी संघटना इव्हेंट स्वरूपात दोन ते तीन दिवस गरबा, दांडिया, फनफेअर व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घडवून आणतात.
प्रसाद हिरे मित्रमंडळ व भाजप मालेगावतर्फे २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त डॉ. बी. व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट व रिसर्च सेंटर महाविद्यालयाच्या गोळीबार मैदानावर जागर मातृशक्तीचा कार्यक्रम होणार आहे. यात २२ सप्टेंबरला दुगदिवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २३ ला मीनल प्रभुणे भगिनी ग्रुपचा झिम्मा फुगडी कार्यक्रम,२४ ला येवला येथील सुरेश गोंधळे ग्रुपचा गोंधळ आई भवानीचा २५ ला कोपरगाव येथील भानुदास महाराज बैरान यांचा भारुड कार्यक्रम होणार आहे.
बाजारपेठेला मिळणार झळाळी
पितृपक्षात बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट असतो. नवरात्रोत्सव सुरू होताच बाजारपेठेला झळाळी मिळणार आहे. उत्सवाचे दहा दिवस, दहा रंग साजरे करीत ग्राहक काबीज करण्यासाठी आस्थापना सज्ज झाल्या आहेत. जीएसटीचे दर कमी झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहन व्यवसायालाही मोठी अपेक्षा आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दगडी, पितळी दिवे, रांगोळी, टिपऱ्या, घागरा, विविध वेशभूषा यासह पूजेचे साहित्य आदींनी बाजारपेठ सजू लागली आहे.
२६ ला सोनू महाराज ग्रुप मालेगाव यांचा माता की चौक जगराता हा कार्यक्रम होईल. तर २७ सप्टेंबरल महिला महामेळावा होईल. या मेळाव्यासान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, माज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या प्रमुख पाहुण्न असतील. याच कार्यक्रमांदरम्यान सामूहिक गरव नृत्य व विविध कार्यक्रम होतील. गरबा नृव दरम्यान सर्वोत्कृष्ट गरबा व वेशभूषा आदींसान पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाज नेते प्रसाद हिरे यांनी केले आहे.