

नाशिक : पीरबाबा दंगल प्रकरणातील मुख्य संशयित सराईत गुन्हेगार बंटी शेख यास अंमली विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
पोलिस आयुक्तालय हद्दीत विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनिय खबर मिळाली की, दंगलीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अकील पिर मोहम्मद शेख उर्फ बंटी शेख (३९, रा. खंडोबा चौक, वडाळा गाव) हा त्याचे राहते घरी आला आहे. त्यानुसार कोल्हे यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती व सुचना देवुन सदर संशयितास ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना केल्या.
अमली विभागाच्या पथकाने आरोपीच्या घरा जवळ सापळा लावला. पोलिसांची चाहुल लागताच तो घराच्या गच्ची वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पथकाने शिताफिने त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. बंटी शेख वर यापूर्वीही शहर व ग्रामीण हद्दीतील विविध पोलिस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील, अंमलदार गणेश वडजे यांच्या पथकाने केली.