Nashikroad Central Jail | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर; 33 ग्रॅम चरस तस्करी प्रकरणात रक्षकच अटकेत

Nashikroad Central Jail | ३३ ग्रॅम चरस तस्करी प्रकरण : विविध गुन्हेगारी घटनांनी खळबळ
Nashikroad Central Jail
Nashikroad Central Jail
Published on: 
Updated on: 

नाशिक : प्रतिनिधी
संवेदनशील आणि हायप्रोफाइल गुन्हेगारांचा मुक्काम असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थाेशी धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कैद्यांतील टोळीयुद्ध, प्राणाघातक हल्ले, अमली पदार्थांचे सेवन, मोबाइलचा सर्रास वापर, सोशल मीडियावर व्हायरल होणारे कैद्यांचे व्हिडिओ आणि लाचखोरीच्या 'कथित' प्रकारांमुळे आधीच चर्चेत असलेल्या कारागृहात आता चक्क सुरक्षाक्षकच अमली पदार्थांच्या तस्करी सहभासी असल्याचे उघड झाल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Nashikroad Central Jail
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक; काँग्रेसने दाखल केलेला अकरावा अर्ज छाननी समितीतून अधिकृतपणे फेटाळला

रवींद्र एकनाथ पाटील (३५, नेमणूक मध्यवर्ती कारागृह) असे या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या कारागृह रक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह तुरुंग अधिनियमंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वारवर आणि झडती कक्षात सुरक्षा तपासणीची यंत्रणा कार्यरत असतानाही संबंधित कर्मचाऱ्याने अमली पदार्थ आत नेण्याचा प्रयत्न केल्याने या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मागच्या महिन्यात कारागृहाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतरही कारागृहातील गैरप्रकारांना आळा बसलेला नसत्याचे या घटनेवरून दिसून येते. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणी नेमकी किती प्रभावी आहे, कर्मचाऱ्यांची नियमित झडती घेतली जाते का आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

स्मार्टफोन बंदीचा दावा फोल

नाशिकरोड कारागृहात मोबाइल वापरवर कठोर बंदी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, क्वॉरंटाइन वॉर्डमध्ये सराईत बंदीवान कॅरम खेळतानाचे आणि मोबाइलवर चित्रीकरण करून ते इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याचे व्हिडिओ यापूर्वी समोर आले होते. सनी पगारे आणि श्रींजय उर्फ गौरव खाडे या बंदीवानांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते.

कारगृहात शिजतो गुन्हेगारीचा कट

मेफेड्रॉन तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी नाशिकरोड, पुणे आणि ठाणे कारागृहातून अमली पदार्थ निर्मितीचे फॉर्म्युले तयार केल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. शहरात टोळीयुद्ध आणि हत्येच्या सुपाऱ्यांचे धागेदोरे कारागृहाच्या तटबंदीआडून हलवले जात असल्याचा प्रकार समोर आले आहेत. कैद्यांना आपत्त्यांशी संपर्क साधण्यासाठी दिलेल्या सुविधांचा गैरफायदा, सिमकार्ड घोटाळ्याचे प्रकार चर्चेत आले आहेत. सुरक्षेतील त्रुटींमुळे कैद्यांवर प्राणाघातक हल्ले, अमानुष अत्याचार आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडल्या आहेत.

Nashikroad Central Jail
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धिकारी, बंदीवानांमध्ये संगनमत?

जामिनावर बाहेर आलेला काही कैद्यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकारी आणि संशयित बंदीवानांच्या 'कथित' संगनमतून कारागृहातील गैरप्रकारांना अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.

यापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी व्हिडिओचे चित्रीकरण करणाऱ्या अज्ञातार गुन्हा दाखल केल्याची चर्चा होती. तत्कालीन प्रकरणात कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झाल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रकरणातील अंतर्गत यंत्रणेची जबाबदारी निश्चित झाली का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.