Nashik | 'प्रधानमंत्री मातृवंदना योजने'त जि. प.चा गौरव

Nashik ZP Matru Vandana Yojana- मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रताप पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार
Nashik ZP Matru Vandana Yojana
नाशिक : मुंबई येथील कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील. समवेत उपस्थित अधिकारी.
Published on
Updated on

नाशिक : 'प्रधानमंत्री मातृवंदना योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित नवव्या राष्ट्रीय पोषण माहच्या राज्यस्तरीय शुभारंभ सोहळ्यात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते व विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) प्रताप पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी विजय पचलोरे, जिल्हा समन्वयक अश्विनी केदार हे मंचावर उपस्थित होते.

Nashik ZP Matru Vandana Yojana
Gangapur Road Traffic | गंगापूर रोडच्या वाहतूक कोंडीला मिळणार पर्यायी मार्ग

'प्रधानमंत्री मातृवंदना योजना' ही गर्भवती महिला यांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये व दुसऱ्या खेपेस मुलगी झाल्यास सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतानाच माता व बालकांच्या आरोग्य व पोषणाला प्रोत्साहन देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

Nashik ZP Matru Vandana Yojana
Nashik Kumbh Mela | कुंभसाठी रस्तेकामांना 'गती'चा डोस

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'प्रधानमंत्री मातृवंदन योजने' साठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका मदतनीस यांच्यात समन्वय साधला असून, हे यश केवळ जिल्हा कक्षाचे नसून ५ हजार ७०५ अंगणवाड्यांचे असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पाटील यांनी सांगितले. या यशाबद्दल ओमकार पवार यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news