Nashik ZP School |"शालेय गणवेशाच्या गुणवत्तेत मोठा 'झोल'! नाशिक जिल्हा परिषदेच्या 16 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा"

Nashik ZP School | राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या हक्काच्या कपड्यांच्या गुणवत्तेत मोठा घोळ उघडकीस आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
School Education
School EducationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या हक्काच्या कपड्यांच्या गुणवत्तेत मोठा घोळ उघडकीस आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या निर्देशानुसार संकलित केलेल्या गणवेशांच्या प्रयोगशाळा तपासणीत शासनाने ठरवून दिलेल्या कपडाच्या निकषांना हरताळ फासल्याचे उघड झाले आहे.

School Education
Panchganga River | पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ; पंचगंगा ३६ फुटांवर

गंभीर प्रकारानंतर थेट १६ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यात पॉलिस्टर व कॉटनचे प्रमाण किमान ७०:३० किंवा ८०:२० असणे अनिवार्य आहे.

मात्र, प्रयोगशाळेच्या चाचणीत धक्कादायक वास्तव समोर आले. बागलाण, सुरगाणा, चांदवड आणि पेठ तालुक्यातील १६ जिल्हा परिषद शाळांमधील गणवेशांमध्ये निकषांचे उल्लंघन झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही शाळांच्या नमुन्यांमध्ये कॉटनचे प्रमाण चक्क शून्य टक्के असून, १०० टक्के पॉलिस्टर कापड वापरण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

ओमकार पवार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत 'झीरो टॉलरन्स'ची भूमिका घेतली आहे. या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही योजनेमध्ये गुणवत्तेबाबत तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

"शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व नियमबद्ध अंमलबजावणी होणे ही सर्व संबंधितांची जबाबदारी असून, त्यात हलगर्जीपणा अथवा अनियमितता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल."

ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.

School Education
महागाईचे आव्हान

या आहेत 16 शाळा

बागलाण, सुरगाणा, चांदवड आणि पेठ तालुक्यातील खालील जिल्हा परिषद शाळांचा यात समावेश आहे:

  • बागलाण तालुका: कोटबेल, दुधमाळ

  • सुरगाणा तालुका: माणी, आंबोडा, चिंचपाडा व बोरपाडा (ग)

  • चांदवड तालुका: सोग्रस, दुगाव, खडकओझर व आसरखेडे

  • पेठ तालुका: हरणगाव, आमलोन, आसरबारी, माळेगाव, गारमाळ व देवगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news