Nashik Zilla Parishad | सीईओ आल्या पायी, तर अधिकारी सार्वजनिक वाहनांनी

Nashik Zilla Parishad | खासगी वाहनांना 'नो एंट्री'; 'नो व्हेईकल डे'ला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
Nashik ZP Election
Zilla Parishad Nashik / जिल्हा परिषद नाशिकPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दर सोमवारी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी स्वतःच्या खासगी वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

Nashik ZP Election
Mumbai Naka MD drugs case - मुंबई नाका परिसरामध्ये एमडी ड्रग्जविरोधात कारवाई, तिघांना अटक, ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

या आवाहनाला सोमवारी (दि. १८) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. स्वतः संगमनेरे या सोमवारी (दि. १८) सकाळी आपल्या घरून पायी चालत जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रहित लक्षात घेऊन ऊर्जा आणि इंधन बचतीबाबत जबाबदार वर्तन करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने शासकीय पातळीवर खर्चात काटकसर करण्यासाठी १९ कलमी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या उपाययोजनांची अत्यंत कडक अंमलबजावणी नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून प्रतिभा संगमनेरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व विभागप्रमुख, अधिकारी तसेच अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना लेखी सूचना दिल्या होत्या.

Nashik ZP Election
Nashik Election 2026 | नाशिक विधान परिषदेवर शिवसेनाच दावा करणार! खासदार श्रीकांत शिंदेंनी जागावाटपाचा फॉर्म्युला केला स्पष्ट

दर सोमवारी खासगी वाहने घरातच ठेवून सार्वजनिक बस किंवा इतर सरकारी व पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले होते. मोहिमेचे नेतृत्व करीत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेरे स्वतः घरून चालत कार्यालयात आल्या. बहुतांश विभागप्रमुख, अधिकारी आणि शेकडो कर्मचारी वर्ग हे सकाळी खासगी वाहने घरीच ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि शहर वाहतुकीच्या बसने प्रवास करीत जिल्हा परिषदेत पोहोचले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील हेदेखील खासगी इंधन वाहनांचा वापर टाळून कार्यालयात आले, तर कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांच्या इलेक्ट्रिकल व्हेईकल (ईव्ही) या पर्यावरणपूरक वाहनाचा वापर करून अनेक विभागप्रमुख नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी एकत्र दाखल झाले. केवळ अधिकारीच नव्हे, तर सर्व श्रेणीतील कर्मचारी वर्गान या मोहिमेत सहभाग नोंदवला. अनेकांनी खासगी बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर वाहनांच्या गर्दीविना अत्यंत मोकळा आणि शांत दिसत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news