White Oud Attar Price | तरुणाईला भुरळ घालतंय अत्तराचं जग! जन्नत-ए-फिरदौस आणि व्हाइट ऊदला सर्वाधिक पसंती

White Oud Attar Price | कपडे आणि हेअरस्टाइलसोबत आता सुगंधालाही महत्त्व; तरुणाईचा ग्रूमिंग ट्रेंड बदलला
White Oud Attar Price
White Oud Attar Price
Published on: 
Updated on: 

नाशिक : अंजली राऊत

आता शब्दांपेक्षा जास्त अत्तराचा दरवळ बोलतो, तरुणाईच्या या जगात सुगंधच नवी ओळख खोलतो! शायरीतील हे शब्द बदलत्या जीवनशैलीसोबतच तरुणाईच्या ग्रूमिंगच्या बदललेल्या संकल्पनेचे चित्र मांडतात. व्यक्तिमत्त्व आकर्षक बनविण्यासाठी सुगंधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, कपडे, हेअरस्टाइल, लूकसोबतच परफ्युम, बॉडी मिस्ट, डिओ व पारंपरिक अत्तरांची निवड ही तरुणाईची आवड बनली आहे.

White Oud Attar Price
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

सुगंधापुरता मर्यादित न राहता आत्मविश्वास व स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख जपणारे माध्यम म्हणून पाहिले जात असल्याने अत्तराची मागणी वाढत आहे. फ्लोरल, फ्रुटी, वुडी सुगंधांपासून दीर्घकाळ टिकणाऱ्या ओरिजिनल अत्तरांपर्यंत विविध पर्यायांना तरुणाईची पसंती मिळत आहे.

मुंबई, अहमदाबाद, रतलाम व उत्तर भारतीय बाजारपेठांतून अत्तरांचा पुरवठा होतो. अरब देशांतील अत्तरांनाही चांगली मागणी आहे. आजच्या पिढीसाठी सुगंध हा केवळ आकर्षण नसून, ग्रूमिंगचा महत्त्वाचा भाग बनला आहे. विशेषतः तरुणांची या बाजारपेठेतील सहभाग आणि खर्च लक्षणीय असून, मुंबई, पुणे व नाशिकसारख्या शहरांतही परफ्युम व सुगंधी वस्तूंवरील खर्चाचा आलेख चढता आहे.

जन्नत-ए-फिरदौसचा ट्रेंड जोरात

पारंपरिक अत्तरांमध्ये ऊद, मुश्क, अंबर, गुलाब, शमामा, हिना आणि कस्तुरी यांना मागणी कायम आहे. जन्नत-ए-फिरदौस आणि व्हाइट ऊद मिक्स हे अत्तर केवळ ९ मिलीसाठी ८०० रुपये मोजावे लागतात. त्यासाठी तरुणाईकडून अधिक पसंती मिळत आहे. यामध्ये विना केमिकल,

विना अल्कोहोल असे नैसर्गिक सुगंधाचा अर्क काढला जातो, त्यामध्ये व्हाइट ऊद मिक्स केल्याने हे अत्तर दीर्घकाळ सुगंध देत असल्याने तरुणाईमध्ये विशेष पसंतीस उतरत आहे. अरेबियन ऊद, बेला व्हिटा आणि शनाया यांसारख्या सुगंधांसोबतच हिवाळ्यात मसाजसाठी तेलाच्या स्वरूपातील सॉलिड अत्तर तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

फ्लोरल, फ्रुटी की वुडी? तरुणाईचा नवा ट्रेंड

सुगंधाच्या जगात 'फ्लोरल', 'फ्रुटी' आणि 'वुडी' या मुख्य प्रकारांसोबतच या तिन्हीचे मिश्रण असलेल्या सुगंधांनाही मोठी पसंती मिळत आहे. तरुणींमध्ये गुलाब, मोगरा, लीली आणि लॅव्हेंडरसारख्या घटकांचा समावेश असलेल्या सौम्य आणि गोडसर फ्लोरल सुगंधासोबतच संत्री, आंबा, बेरिज, सफरचंद आणि व्हॅनिला असलेल्या फ्रुटी सुगंध आणि बॉडी मिस्टची मोठी चलती आहे.

दिवसाच्या प्रवासात किंवा उन्हाळ्यात ताजेपणासाठी फ्रुटी प्रकार, तर ऑफिस किंवा समारंभासाठी फ्लोरल प्रकाराला पसंती दिली जात आहे. दुसरीकडे तरुणांमध्ये चंदन, देवदार, ऊद, वाळा आणि पचौली यांसारख्या घटकांचा वापर असलेले दमदार आणि रॉयल वाटणारे वुडी सुगंध तसेच मस्क, फ्रेश आणि सिट्रस प्रकार लोकप्रिय ठरत आहेत. रात्रीचे कार्यक्रम, थंडीचे दिवस किंवा फॉर्मल प्रसंगी वुडी सुगंधांची निवड केली जात आहे. तसेच आजकाल 'फ्लोरल-फ्रुटी' किंवा 'वुडी-फ्लोरल'सारख्या मिश्र सुगंधांचाही ट्रेंड वाढत आहे.

दीर्घकाळ टिकणाऱ्या परफ्युमला पसंती

सध्या ग्राहकांचा कल केवळ क्षणभंगुर सुगंधाऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या परफ्युम आणि सुगंधी द्रव्यांकडे आहे. १०० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या विविध रेंजमध्ये बॉडी स्प्रे आणि परफ्युम उपलब्ध असून, ते खरेदी करण्याकडेही कल वाढला आहे. नाशिकमधील जुने नाशिक, दूधबाजार, रविवार कारंजा, शालिमार आणि कॉलेज रोड, नाशिकरोड येथील परिसरातील दुकानांमध्ये विविध सुगंधांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

अत्तराचे माहेरघर म्हणून कनौज मानले जाते. तसेच रतलाम, सौदी अरेबिया, दुबई, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, स्पेन आणि इटली येथील विदेशी परफ्युमसोबतच देशांतर्गत उत्पादनांनाही मागणी आहे. मात्र आयात खर्च, वाहतूक, पॅकेजिंग आणि सुगंधी द्रव्यांच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम प्रीमियम उत्पादनांच्या किमतींवर जाणवतो; तरीही स्थानिक व भारतीय ब्रँडमुळे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये विविध पर्यायांना पसंती दिली जाते.

White Oud Attar Price
PM Awas Yojana | नाशिक जिल्ह्याची राज्यात मोठी झेप! प्रधानमंत्री आवास योजनेत चौथा क्रमांक

अत्तरावर मोठी गुंतवणूक आणि ग्रूमिंगमधील महत्त्व

मुंबई, अहमदाबाद, रतलाम आणि उत्तर भारतातील बाजारपेठांतून अत्तरांचा पुरवठा होत असून, अरब देशांतील अत्तरांनाही चांगली मागणी आहे. आजच्या पिढीसाठी सुगंध हा केवळ आकर्षण नसून ग्रूमिंगचा महत्त्वाचा भाग बनला आहे. विशेषतः तरुणांची या बाजारपेठेतील सहभाग आणि खर्च लक्षणीय असून, मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांतही परफ्युम व सुगंधी वस्तूंवरील खर्चाचा आलेख चढता आहे.

"ओरिजिनल अत्तरासाठी तरुणाईकडून सर्वाधिक मागणी आहे. विशेषतः दीर्घकाळ टिकणाऱ्या अत्तरांना अधिक मागणी आहे. अत्तर हे विना केमिकल असते तर परफ्युम हे केमिकलयुक्त आणि अल्कोहोलयुक्त असते. दीर्घकाळ सुगंध देणारे अत्तर ओरिजिनल असते तर क्षणभंगुर सुगंध देणारे बनावट असते. मुंबई येथून कच्चा माल आणून ग्राहकांच्या आवडीनुसार आम्ही सुगंधित अत्तर बनवून देतो."

— मिराज शकील हाजी शेख, अत्तर उत्पादक व विक्रेता, जुने नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.