

येवला : येवला शहर पोलीससांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 14,500 रुपयांचा 29 बंडल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
अवघ्या महिन्यावर आलेल्या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यावर सरकारने बंदी घातली असूनही बंदी झुगारून येवल्यातील काही विक्रेते नायलॉन मांजाची विक्री चोरीछुपे पद्धतीने करत आहेत. अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी समदा पार्क अमिनानगर या ठिकाणी छापा टाकला. तेथील अफसर अन्सार शेख याच्या ताब्यातून 14,500 किमतीचे 29 नायलॉन मांजाचे बंडल जप्त करण्यात आले असून पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.