Nashik Drought | येवला तालुक्यात दुष्काळाचा पेरू बागांनाही फटका; कष्टाने फुलवलेली झाडे पाण्याअभावी होरपळली

वर्षानुवर्षे जपलेल्या पेरूच्या बागा डोळ्यादेखत वाळल्या; पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, कष्टाचे मोल मातीमोल!
Yeola Guava Orchards Damaged
Yeola Guava Orchards DamagedPudhari
Published on: 
Updated on: 

Yeola Guava Orchards Damaged

येवला: निसर्गाच्या लहरीपणाचा आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ममदापूरच्या दादासाहेब वाघ यांनी गेल्या 3 वर्षांपासून मोठ्या कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने उभ्या केलेल्या पेरूच्या बागा पावसाअभावी आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अक्षरशः वाळून गेल्या आहेत.

हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या बागा आज उजाड झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. येवला तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. पेरूच्या बागा जगविण्याकरिता या शेतकऱ्याने शंभर टँकर पाण्याचे बुक केले होते. मात्र, पंधरा टँकर मिळाल्याने त्यावर बाग जागवता आली नाही. पाणीच नसल्याने टँकर देखील मिळत नसल्याने अक्षरशः पूर्णपणे बागही वाळत चालली आहे.

Yeola Guava Orchards Damaged
Nashik Agriculture News | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामासाठी 373 कोटींचे पीककर्ज वाटप

एकीकडे शेतीतील पिके पाण्याअभावी संकटात असताना दुसरीकडे वर्षानुवर्षे जपलेल्या फळबागाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, फळबाग उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागतात; मात्र ती वाळून जाण्यासाठी पाण्याची टंचाई पुरेशी ठरत आहे.

त्यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून आता या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत आणि नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. दुष्काळाचा फटका केवळ हंगामी पिकांनाच नव्हे, तर वर्षानुवर्षे जपलेल्या फळबागांनाही बसत असल्याने येवला तालुक्यातील शेतीसमोरील संकट अधिक गंभीर बनले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.