Nashik Agriculture News | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामासाठी 373 कोटींचे पीककर्ज वाटप

Nashik Agriculture News | सामोपचार कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढीची प्रतीक्षा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी
nashik jilha madhyavarti sahakari bank
nashik jilha madhyavarti sahakari bank
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात दुष्काळामुळे रब्बी हंगाम अडचणीत सापडलेला असताना दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पीक कर्जवाटपाचा वेग कमी आहे. जिल्हा बँकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षात ३६ हजार ३८५ शेतकऱ्यांना ३७३ कोटींचे पीककर्ज वाटप केले. मागील खरीप हंगामात बँकेने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची १०० टक्के वसुली झाल्याने जिल्हा बँकेने या आर्थिक वर्षात याच शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे.

nashik jilha madhyavarti sahakari bank
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे १३ तालुक्यात दुष्काळ आहे. या परिस्थितीत रब्बी हंगामातील पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली खरी. मात्र, पेरण्या संथगतीने सुरू आहे. जिल्हा बँकेने रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपास साधारण १ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात पीक कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होते. नोव्हेंबरपासून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

२०२५-२६ या वर्षात बँकेने ३६ हजार ५०९ शेतकऱ्यांना ३७६ कोटींचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी ३७४ कोटींची वसुली झाली. ज्या शेतकऱ्यांनी आपली थकबाकी भरली, अशा शेतकऱ्यांनाच हे कर्ज देण्यात आले. मोजक्या शेतकऱ्यांकडे थकबाकी असून ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाच्या सावटातही यावर्षी चांगली वसुली होईल, असे व्यवस्थापनाला वाटते. बँकेशी १०७३ विविध कार्यकारी सोसायट्या संलस आहेत. परंतु, पीक कर्ज व्यवहार बँकेने ज्यांनी कर्जाची परतफेड केली अशा ४४१ संस्थांमार्फत केल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात दुष्काळामुळे रब्बी हंगाम अडचणीत सापडलेला असताना दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पीक कर्जवाटपाचा वेग कमी आहे. जिल्हा बँकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षात ३६ हजार ३८५ शेतकऱ्यांना ३७३ कोटींचे पीककर्ज वाटप केले. मागील खरीप हंगामात बँकेने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची १०० टक्के वसुली झाल्याने जिल्हा बँकेने या आर्थिक वर्षात याच शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे १३ तालुक्यात दुष्काळ आहे. या परिस्थितीत रब्बी हंगामातील पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली खरी. मात्र, पेरण्या संथगतीने सुरू आहे. जिल्हा बँकेने रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपास साधारण १ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे.

मात्र, ऑक्टोबर महिन्यात पीक कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होते. नोव्हेंबरपासून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. २०२५-२६ या वर्षात बँकेने ३६ हजार ५०९ शेतकऱ्यांना ३७६ कोटींचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी ३७४ कोटींची वसुली झाली. ज्या शेतकऱ्यांनी आपली थकबाकी भरली, अशा शेतकऱ्यांनाच हे कर्ज देण्यात आले.

मोजक्या शेतकऱ्यांकडे थकबाकी असून ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाच्या सावटातही यावर्षी चांगली वसुली होईल, असे व्यवस्थापनाला वाटते. बँकेशी १०७३ विविध कार्यकारी सोसायट्या संलस आहेत. परंतु, पीक कर्ज व्यवहार बँकेने ज्यांनी कर्जाची परतफेड केली अशा ४४१ संस्थांमार्फत केल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली.

nashik jilha madhyavarti sahakari bank
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

परतफेड योजनेला मुदतवाढीची मागणी

  • राज्यात आघाडीवर असणारी जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे काही वर्षापासून अडचणीत आहे. थकीत कर्जामुळे बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. या संकटातून बँकेला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना व्याज दरात सवलत देणारी सामोपचार कर्ज परतफेड योजना राबवली. या योजनेची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आली.

  • सप्टेंबरमध्ये बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या योजनेला १ नोव्हेंबर ते ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव शासनाकडे पाठवला. तथापि, अद्याप त्यास अद्यापही मान्यता मिळालेली नाही. बँकेने थकबाकीदार सभासदांसाठी राबवलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेला शासनाने मुदतवाढ देण्याची मागणी आमदार दिलीप बनकर यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.