Nashik POCSO Act Training 2026 | 'पोक्सो'पीडितांना मदतीसाठी सहायकांची भूमिका महत्त्वाची

Nashik POCSO Act Training 2026 | उपायुक्त चंद्रशेखर पगारे : नाशिक विभागस्तरीय प्रशिक्षण
POCSO Act
प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पीडितांना सक्षम व संवेदनशील मदत मिळण्यासाठी सहायक व्यक्तींनी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले.

POCSO Act
Harsul Murder Case | रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; हरसूल पोलिसांनी पुतण्याला ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहायक व्यक्तींचे विभागस्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

याचे उद्घाटन पगारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, बालहक्क आयोगाचे सदस्य संजय सेंगर, सायली पालखेडकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष मिलिंद बाबर, सदस्य अॅड, पल्लवी घुले, पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, डॉ. हेमंत घंघाळे, समुपदेशक पारीख हे उपस्थित होते.

POCSO Act
Nashik Land Recovery | दीड हजार कोटींच्या जमिनीवर अखेर 'महाराष्ट्र शासनाचे' नाव

सचिव भोसले यांनी अशा प्रशिक्षणांमुळे सहायक व्यक्तींचे कार्य अधिक प्रभावी होते, असे सांगितले. पीडित व्यक्तींना साहाय्य करताना आवश्यक कायदेशीर बाबींबाबत अॅड. सेंगर तसेच समुपदेशक श्रीमती पारीख यांनी मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थीना भारतीय नागरी सुरक्षा संहिता,

पोक्सो कायदा, त्यातील नियम, प्रथम माहिती अहवाल, वैद्यकीय तपासणी तसेच समुपदेशन अशा विषयांवर माहिती दिली. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहायक व्यक्तींची भूमिका स्पष्ट करण्यात आली. विभागातील अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील अधिकारी, समुपदेशक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. निवेदिता झेंडे यांनी सूत्रसंचालन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news