Nashik Weather | नाशिकमधून थंडी गायब! किमान तापमान 16 अंशांवर, दुपारी उन्हाचा चटका वाढला

Nashik Weather | नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जाणवणाऱ्या बोचऱ्या थंडीचा जोर आता ओसरला असून, किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
Nashik Weather Forcast
Nashik Weather Forcast
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जाणवणाऱ्या बोचऱ्या थंडीचा जोर आता ओसरला असून, किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २४) नाशिक शहराचे किमान तापमान १६.७ अंश सेल्सिअस, तर निफाडचे १६.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

Nashik Weather Forcast
Nashik Property Tax | नाशिक महापालिकेला कर्मचारी टंचाईचा फटका; मालमत्ता कराच्या मागणीत 15 कोटींची घट

दोन्ही ठिकाणचे कमाल तापमान ३१ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, नाशिकचे कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस, तर निफाडचे ३१.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

नाशिकमध्ये आर्द्रता ४१ टक्के, तर निफाडमध्ये सकाळी ७३ आणि सायंकाळी ४३ टक्के होती. गेल्या आठवड्यात नाशिक आणि निफाडमधील किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास घसरला होता. निफाडमध्ये तर तापमान ५.६ अंशांपर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी अनुभवायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर तापमानाने हळूहळू उसळी घेतली आहे.

Nashik Weather Forcast
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

सध्या पहाटे आणि रात्री काहीसा गारवा जाणवत असला, तरी दुपारी उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी उबदार कपडे आणि दुपारी उन्हापासून बचाव, अशी दुहेरी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. तापमानातील या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासासारख्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

द्राक्ष बागायतदारांना दिलासा.

निफाडसह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यात गेल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा ५ ते १० अंशांपर्यंत घसरल्याने द्राक्षबागांमध्ये थंडीचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. विशेषतः फुलोरा, मणीधारणा आणि मण्यांच्या वाढीच्या अवस्थेतील बागांसाठी कमी तापमान चिंतेचा विषय ठरत होते. मात्र, आता किमान तापमान १६ अंशांच्या पुढे गेल्याने द्राक्ष बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.