Nashik water supply |नाशिककरांना दिलासा; शनिवारची पाणीकपात रद्द

Nashik Saturday Water Cut Cancelled- नाशिककरांना दिलासा; शनिवारची पाणीकपात रद्द
Nashik Water Supply
Nashik Water Supply pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी घेतला असून, दर शनिवारी करण्यात येणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. महासभेतील महापौरांच्या निर्देशांनुसार येत्या शनिवार (दि.१८) पासून नाशिक शहरातील पाणीपुरवठा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शासन, महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार १७ जून २०२६ पासून संपूर्ण नाशिक महापालिका क्षेत्रात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Nashik Water Supply
Weapon License Application Delays |शस्त्र परवान्यांना लालफितीचा अडसर

या माध्यमातून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, सध्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून गंगापूर, मुकणे आदी जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर १७ जुलै रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत शनिवारची पाणीकपात रद्द करण्याबाबत चर्चा झाली.

त्यानंतर महापौरांनी शनिवारचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार दि. १८ जुलैपासून संपूर्ण नाशिक शहरातील नागरिकांना शनिवारीही नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गेल्या महिनाभरापासून शनिवारी पाणी बंद राहण्यामुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.

Nashik Water Supply
Weapon License Application Delays |शस्त्र परवान्यांना लालफितीचा अडसर

महापालिका प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, तसेच पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, भविष्यात पावसाची स्थिती आणि धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news