

हळदीचा नवरदेव ते नवसाला पावणारा वीरांची मिरवणूक आज निघणार
वीर मधोबा महाराजांची जपली तीनशे वर्षोची परंपरा
आज धुलिवंदन, ग्रहण आणि होळीची कर
होळी, धुलिवंदन कोणत्या राशींसाठी फलदायी राहणार
नाशिक : अंजली राऊत
होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण असून हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी शहरात सर्वत्र आनंदाने होळी साजरी करण्यात आली. होळीच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी (दि.३) दुपारी २ वाजता धुलिवंदनाच्या दिवशी मानाच्या वीरांची वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. तीनशे वर्षांपासून शहरातील जुने नाशिकमधील चव्हाटा येथून वीर नाचण्याची प्रथा जुन्नरे घराणेशाहीचा वीर मधोबा महाराज यांच्याकडून पूर्वापारपासून भक्तिभावाने जपली जात आहे.
मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गूनमास असून यामध्ये येणारी पोर्णिमा म्हणते हुताशनी पोर्णिमा अर्थातच होळी सोमवारी (दि.२) चतुदर्शी संध्याकाळी ५.५६ मिनिटांनी संपल्यानंतर प्रदोष काळात पोर्णिमा सुरु झाली आहे.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.३) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रदोष काळ आहे. त्यामुळे पोर्णिमा साडेतीन प्रहरापेक्षा कमी असलेल्या प्रदेशामध्ये होलिकादहन सोमवारी (दि.२) करण्यात आली. तर ज्या प्रदेशामध्ये मंगळवारी (दि.३) साडेतीन प्रहरापेक्षा अधिक काळ पोर्णिमा असेल आणि प्रतिपदा वृद्धीगामी असेल त्या प्रदेशामध्ये होलिकादहन करण्यात आले.
मंगळवारी (दि.३) ग्रस्तोदीत चंद्रग्रहण असून आणि प्रदोषकाल सुरु होण्यापूर्वी पोर्णिमा समाप्त होत आहे. सोमवारी (दि.२) संध्याकाळी ५.२६ मिनिटे ते रात्री २९ वाजून पहाटेपर्यंत ५.३० पर्यंत भद्रा आहे. अशावेळी प्रदोष काळातही भद्रायोग असताना सोमवारी (दि.२) होलिकादहन भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
वीर नाचवण्याची अशी आहे अख्यायिका...
तीनशे वर्षांपूर्वी तेली समाजाचे मानकरी यांच्या स्वप्नात वीर आले आणि त्यांनी सांगितले की, जुन्नरे घराण्यात मधोबा या नावाने माझा पांगराच्या लाकडापासून मुखवटा बनवला जावा. त्यानंतर यशवंत बाळाजी जुन्नरे यांच्या देव्हाऱ्यात तो मुखवटा ठेवून माझी मान्यता हळदीचा नवरदेव म्हणून मिरवावा. लोकसेवेचे कार्य अपूर्ण राहिल्याने धुलिवंदनाच्या दिवशी मिरवणूक काढून हे वीर नाचवले तर नवसाला पावणारा म्हणून भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील, असे सांगितले. तेव्हा पासून जुन्नरे घराण्यात मधोबा महाराज वीर म्हणून नाचवण्याची प्रथा पूर्वापारपणे जपली जात आहे.
या राशींसाठी ग्रहणाचे वेध याप्रमाणे...
मिथून, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी शुभफलदायी आहे.
मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींसाठी मिश्रफलदायी आहे तर वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ठ फलप्राप्ती आहे.
आज मंगळवारी (दि.३) ग्रहण आणि धुलिवंदन साजरा करता येईल. या दिवशी धुलिवंदन, ग्रहण आणि होळीची कर अशा तीन गोष्टी एकत्रितपणे आल्या आहेत. तसेच बुधवारी (दि.४) ग्रहणाची कर आहे. चंद्र उदयाच्या आधीपासून ग्रहणाची सुरुवात झालेली असेल, म्हणून दुपारी ३.२० ला स्पर्श होऊन ग्रहणाची सुरुवात होऊन संध्याकाळी ६.४८ मिनिटाला मोक्ष आहे. चंद्र सुर्यास्तापासून ते ग्रहणमोक्षाचा जो कालावधी असेल तो १२ ते १५ मिनिटांचा पुण्यकाळ असेल. ग्रहणाचे हे वेध मंगळवारी (दि.३) सुर्याद्यापासून सकाळी ६.३० वाजेपासून वेध लागत आहेत तर संध्याकाळी ६.४८ मिनिटापर्यंत १२ तासापर्यंत ग्रहणाचे वेध आहेत. त्यामुळे दुपारी ३.२० पासून संध्याकाळी ६.४८ पर्यंत या साडेतीन तासात दानधर्म, देवपूजा करावे. -
अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ज्योतिषाचार्य
मधोबा महाराज वीर यांचे मानकरी गोकुळ दत्तात्रय जुन्नरे यांच्याकडे हा मान देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जुन्नरे परिवार यांना वीर नाचवीन्याचा आनंद घेतला जातो. तसेच नवसाला पावणारा वीर म्हणून एका लाल वस्त्रात खोबऱ्याची वाटी, खंडेराव किंवा वीरांचा टाक घेऊन हे बालवीरांकडून त्यांच्या घराण्यातील वीर नाचवले जात असतात.
- गोकुळ जुन्नरे, मधोबा महाराज वीर मानकरी.