नाशिक : मासिक ५० हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंपाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार भेंडाळी शिवारात ८ सप्टेंबरच्या सकाळी घडला.
या प्रकरणी सुरेश कमानकर (६१, रा. सायखेडा) यांनी रविवारी (दि. १३) सायखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार त्यांनी भेंडाळी रस्त्यावरील बंद पडलेला पेट्रोलपंप पुन्हा सुरू करण्याची तयारी केली होती. त्यानुसार साफसफाई करत मनमाडहून पेट्रोल व डिझेलचा टँकर मागविला होता. तत्पूर्वी, संशयित सुदाम सोनवणे, अमोल सोनवणे (दोघे रा. मुसे), विशाल कापसे, विवेक खालकर, साहिल कुरणे, माधव मोगल आदींनी पंप चालू करायचा असेल तर दरमहा ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यास कमानकर यांनी नकार दिल्याने चौघांनी पंपाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक सैंदाणे तपास करत आहेत.