नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – गेल्या दोन दिवसापासून नांदगांव तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमोदे परिसरातील नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार यांनी महसूल प्रशासनाला दिले.
कधी दुष्काळ कधी अवकाळी तर कधी गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना नांदगाव तालुक्यातील शेतकरी करत असून, गेल्या दोन दिवसापासून झालेल्या अवकाळीने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. तालुक्यातील आमोदे बोराळे परिसरात मंगळवारी तसेच बुधवारी सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावल्याने, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, शेवगा, डाळिंब आदी पीके जमिनदोस्त झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्याने नांदगांवचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी प्रत्यक्ष गारपिटीने बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली अवकाळीने बाधित झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
महसूल प्रशासनाच्या वतीने गुरुवार दि. २९ पासून प्रत्यक्ष पंचनामा करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी तसेच आमदार कांदे यांचे प्रतिनिधी सागर हिरे बेळगावचे सरकल काळे तलाठी तुषार येवले उपसरपंच भूषण पगार ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पगार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजर राहवत गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष पाहणी केली असून यात कांदा मका शेवगा डाळिंब आधी पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. सुनील सैंदाणे, तहसीलदार नांदगाव
हेही वाचा :