Unseasonal Rain Nashik | जिल्ह्यात 'अवकाळी'चा अंदाज

Unseasonal Rain Nashik | जिल्ह्यात 'अवकाळी'चा अंदाज
Unseasonal Rain Nashik
Unseasonal Rain Nashik
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेले असतानाच, आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस म्हणजेच २०, २१ आणि २२ एप्रिल रोजी येलो अलर्ट जाहीर केला असून, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर हवामानात मोठा बदल होणार आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अचानक येणाऱ्या या संकटामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अवकाळी पावसाचे सावट पाहता ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने शेतकरीवर्गाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. काढणीला आलेला उन्हाळी कांदा सुरक्षित ठिकाणी हलवावा किंवा तातडीने प्लास्टिक कागदाने झाकून घ्यावा. पावसाच्या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

Unseasonal Rain Nashik
TCS Nashik Case: ..तर निदा खान पोलिसांना जाणार शरण !

नाशिकचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेले असतानाच, आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस म्हणजेच २०, २१ आणि २२ एप्रिल रोजी येलो अलर्ट जाहीर केला असून, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर हवामानात मोठा बदल होणार आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain Nashik
Ashok Kharat Nashik Case | भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची 'फॉरेन्सिक' टीमकडून पाहणी

अचानक येणाऱ्या या संकटामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाचा पारा आता ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रविवारी (दि.१९) शहराचे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. वाढत्या उष्णतेसोबतच आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. दिवसभर उकाडा जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहेत. जिल्ह्याचा विचार करता मालेगावमध्ये उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. सकाळी १० पासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news