

नाशिक : नाशिक पोलिस महाकुंभ टर्फ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नेरकर प्रॉपर्टीज, एबीएस फिटनेस, फ्रवशी व विश्वास टर्फ प्ले झोन यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी पोलिस आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते भद्रकाली पोलिस ठाणे व नाशिक महानगरपालिका संघांमध्ये नाणेफेक करण्यात आली.
यावेळी विषेश पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, महाराष्ट्र केडर मिळालेले 13 प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, अभिजित शेलार, पोलिस उपायुक्त किशोर काळे, मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी, पोलिस निरीक्षक मधुकर कड, अंकुश चिंतामण, मनोहर कांडेकर, जयंत शिरसाट आदी उपस्थिती होती. अंबड, सरकारवाडा, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पंचवटी पोलिस ठाणे आदी संघांनी उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडविले.
विश्वास टर्फ प्ले झोन येथे १५ व १६ डिसेंबर कालावधीत ही स्पर्धा सुरू आहे. सामने साखळी पद्धतीने खेळविले जात असून प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी देण्यात आली. कुंभमेळा पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुंभमेळा यशस्वीचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला. स्पर्धेचे समालोचन राजेंद्र कुलकर्णी यांनी केले.
स्पर्धात सहभागी संघ असे...
पंचवटी, उपनगर, देवळाली कॅम्प, मुंबई नाका, विशेष शाखा, प्रिंट मीडिया असोसिएशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (नाशिक मनपा), नाशिक क्रिएशन संघ, नाशिक रोड, म्हसरूळ, गंगापूर, सातपूर, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, गुन्हे शाखा युनिट क्रमांक १, मोटार परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, शहर वाहतूक शाखा, भद्रकाली पोलीस ठाणे, पोलिस आयुक्त कार्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, डॉक्टर असोसिएशन, तांत्रिक विश्लेषण विभाग, इंदिरानगर ठाणे, नाशिक ग्रामीण बार असोसिएशन,आडगाव, जलद प्रतिसाद पथक संघ, एमआयडीसी चुंचाळे, दामिनी पथक, पंचवटी, उपनगर, देवळाली कॅम्प, मुंबई नाका, नाशिक रोड, म्हसरूळ, गंगापूर, सातपूर ठाणे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक क्रीडा मोटर परिवहन विभाग संघ, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा, भद्रकाली ठाणे, पोलिस आयुक्त कार्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, डॉक्टर असोसिएशन, तांत्रिक विश्लेषण विभाग, इंदिरानगर ठाणे, नाशिक ग्रामीण पोलिस, बार असोसिएशन, आडगाव ठाणे, एमआयडीसी, दामिनी पथक, जिल्हा परिषद तसेच माध्यम समूहाचे संघ सहभागी झाले होते.