Kumbh Mela 2026 | कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी

Kumbh Mela 2026 | नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या 'भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६' योजनेअंतर्गत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून, राज्य सरकारने तो संबंधित यंत्रणांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Zilla Parishad Anganwadi |अंगणवाडीतील चिमुरड्यांना मिळणार नवा 'युनिफॉर्म'

या निधीतून प्रामुख्याने रस्ते विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. डहाणू-जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक-औरंगाबाद मार्गावरील सहा लेन काँक्रीट रस्ता व पालखी मार्ग बांधकामासाठी ३५ कोटी रुपये, शिर्डी-राहाता बायपास रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १६.५ कोटी रुपये, तर नाशिक-दिंडोरी-वणी-नंदुरी रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३.०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या सर्व कामांची रस्त्याच्या अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. सदर निधी नगर विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यात येणार असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आहरण व नियंत्रण अधिकार देण्यात आले आहेत. तसेच कुंभमेळा आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Ashok Kharat Nashik Case | खरातकडून 'मर्सिडीज' सह पाच कोटींची खंडणी

प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेला निधी केवळ मंजूर उद्दिष्टांसाठीच वापरणे बंधनकारक असून, त्याचा पूर्ण वापर ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. निधीचा विनियोग केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पांवर दुबार निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच कोणताही बदल करावयाचा असल्यास केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, वाहतूक सुलभता व भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news