Trimbakeshwar Kumbh Mela 2026 | गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी नाशिक सज्ज

Trimbakeshwar Kumbh Mela 2026 | एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उभारणार; नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्यात आली.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थासाठी वे-फाइंडिंग प्रणालीचे दिशादर्शक लावणार

सिंहस्थ कुंभमेळा २०२७दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेता गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, बुधवारी (दि.३) यासंदर्भात आंतरविभागीय समन्वय बैठक झाली.

विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थासाठी वे-फाइंडिंग प्रणालीचे दिशादर्शक लावणार

या बैठकीत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, नाशिक परिक्षेत्र पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिस, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर, ईवाय मोबिलिटी टीम, पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे तर एकात्मिक पध्दतीने काम करणे NASHIK SHANEY आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल. त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे. बैठकीत साधुग्राम नियोजन, घाट व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन, पोलिस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news