Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थासाठी वे-फाइंडिंग प्रणालीचे दिशादर्शक लावणार

Nashik Kumbh Mela 2027 | ऑलिम्पिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत नियोजन बैठक; आठवडाभरात स्पॉट व्हिजिटनंतर करणार आराखडा तयार
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाविकांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सहज, सुलभआणि विनाअडथळा मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने वैज्ञानिक पद्धतीच्या साइनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीच्या नियोजनाला सुरुवात केली. यासंदर्भातील उच्चस्तरीय बैठक सोमवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे पार पडली.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Zilla Parishad | सीईओ आल्या पायी, तर अधिकारी सार्वजनिक वाहनांनी

बैठकीस ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, शहर पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, एएसआय सहायक संचालक अमोल गोटे, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, ग्राफिक्स बियाँड सहसंस्थापक बारिश दाते, आंतरराष्ट्रीय वे-फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, कुंभमेळा प्राधिकरण मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियातील डॉटर्डेश या वे-फाइंडिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रातील संस्थेचे सहसंस्थापक असलेले मार्क रॉस यांनी सिडनी ऑलिम्पिकसह विविध ऑलिम्पिक स्पर्धांसाठी साइनेज आणि नेव्हिगेशन प्रणालीवर काम केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि शहरी वाहतूक व्यवस्थांमध्येही सल्लागार म्हणून काम केले आहे.

मोठ्या प्रमाणातील गर्दी व्यवस्थापनासाठीच्या वे फाइंडिंग प्रणालीतील त्यांचे काम जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त मानले जाते. बैठकीत २०१५ मधील नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात वापरण्यात आलेल्या साइनेज प्रणालीचा तसेच प्रयागराज महाकुंभआणि इतर मोठ्या धार्मिक व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतील दिशादर्शक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ २०२७ दरम्यान गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांना मार्गदर्शनासाठी आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीची साइनेज प्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

वे-फाइंडिंग प्रणालींवर चर्चा

बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिका, अभियांत्रिकी विभाग आणि तांत्रिक तज्ज्ञांनी स्थायी, अस्थायी बहुभाषिक फलक, प्रमाणित डिझाइन, वाहतुकीचा प्रवाह, पार्किंग, घाट, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांशी सुसंगत दिशादर्शक प्रणालीवर चर्चा केली. मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांत वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वे-फाइंडिंग प्रणालींचाही अभ्यास करण्यात आला.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik MLC Election | शिंदे शिवसेना-भाजपत रस्सीखेच

स्पॉट व्हिजिट करणार

येत्या आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिका, अभियांत्रिकी विभाग आणि तांत्रिक पथकांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यांचे आयोजन नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करत दिशादर्शक व्यवस्थेचा आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

भाविकांना कोणालाही विचारावे लागू नये, इतकी स्पष्ट आणि सहज समजणारी दिशादर्शक व्यवस्था असावी. संपूर्ण वे-फाइंडिंग प्रणाली ही सोपी, बहुभाषिक आणि प्रथमच येणाऱ्या भाविकांनाही सहज समजेल, अशी असणे आवश्यक आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, कुंभ प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news