Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी मोठी तयारी! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

Nashik Kumbh Mela 2027 | गर्दी, वाहतूक अन् आपत्ती व्यवस्थापनावर राहणार नजर : मंगळवारी आंतरविभागीय बैठक
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आता अत्याधुनिक 'डिजिटल ट्विन' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थाच्या रस्ते कामांमध्ये वीजवाहिन्यांचा धोका; महापारेषणचा नाशिक महापालिकेला गंभीर इशारा!

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (एनटीकेएमए) यासाठी पुढाकार घेतला असून, या प्रणालीच्या अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित करण्यासाठी २४ नोव्हेंबरला आंतरविभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता जुन्या जिल्हा परिषद भवनातील आयुक्त कार्यालयात बैठक होईल.

डिजिटल द्विन प्रणाली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरशी (आयसीसीसी) संलग्न राहणार आहे. जीआयएस आधारित एकाच व्यासपीठावर विविध विभागांचा डेटा उपलब्ध करून देणे, प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन करणे आणि त्यानुसार तातडीने निर्णय घेणे, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.

कुंभमेळ्यातील गर्दीची घनता, भाविकांच्या हालचाली आणि संभाव्य गर्दीच्या ठिकाणांचे पूर्वानुमान या प्रणालीद्वारे घेता येणार आहे. गर्दीच्या कोंडीची ठिकाणे तसेच सुरक्षेच्या संभाव्य धोक्यांची आगाऊ माहिती मिळवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. अतिवृष्टी किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास घाट परिसरावर होणारे परिणाम तपासून भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे नियोजनही करता येणार आहे.

एखाद्या ठिकाणी उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम होल्डिंग एरिया, पार्किंग, शटल सेवा आणि वाहतूक व्यवस्थेवर कसा होईल, याचे विश्लेषण करून संबंधित यंत्रणांना समन्वित उपाययोजना सुचविण्याची क्षमता या प्रणालीत असेल. संभाव्य संकटाची आगाऊ सूचना देऊन पोलीस, अग्निशमन, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना आवश्यक मनुष्यबळ व संसाधने वेळेत तैनात करण्यासही मदत होणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik TCS Case : नाशिक 'टीसीएस' प्रकरणी 'एमआयएम' नेते इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

सर्व डेटा एकाच व्यासपीठावर या बैठकीला पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), एसटी महामंडळ, आरोग्य, जलसंपदा, स्मार्ट सिटी, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांसह त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

दहा कंपन्यांकडून संकल्पना आराखडे

या प्रकल्पासाठी प्राधिकरणाने यापूर्वीच इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) मागवली आहे. तांत्रिक सादरीकरणानंतर निवडल्या जाणाऱ्या दहा कंपन्यांना सीसीटीव्ही फुटेज, जीआयएस नकाशे, वाहतूक आराखडे आणि मागील पुरासंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माहितीच्या आधारे कंपन्यांना प्रूफ ऑफ कन्सेप्ट (पीओसी) तयार करावा लागणार आहे. त्यातून उत्कृष्ट पाच कंपन्यांची निवड करून पुढील अंतिम निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.