Nashik Trimbakeshwer Election News : कुंभनगरीत भाजप बालेकिल्ल्याला सुरूंग

भाजप - 6, शिवसेना शिंदे गट - 6, राष्ट्रवादी अजित पवार गट - 8
त्र्यंबकेश्वर : त्रिवेणी तुंगार यांचा नगराध्यक्षपदी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष.
त्र्यंबकेश्वर : त्रिवेणी तुंगार यांचा नगराध्यक्षपदी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष.Pudhari News Network
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर (नाशिक): देवयानी ढोन्नर

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणार्‍या त्र्यंबकेश्वरला शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली असून, भाजपचे उमेदवार तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय कैलास घुले यांचा पराभव त्रिवेणी तुंगार यांनी 868 मतांनी केला. यामुळे कुंभमेळानगरीने महाजनांना नाकारले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने सर्वाधिक जागा जिंकत आपली पकड मजबूत केली आहे. येथे महायुतीमधील घटक पक्षांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढविली. आगामी कुंभमेळा लक्षात घेत, नगराध्यक्षपदाची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या होत्या. भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची उमेदवारी देताना मुलाखतींचा केलेला फार्स आणि इच्छुकांच्या मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या मुलाखती पाहता, भाजपला एकहाती सत्ता मिळेल असे वातवरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

त्र्यंबकेश्वर : त्रिवेणी तुंगार यांचा नगराध्यक्षपदी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष.
Nashik Bhagur Election News : भगूरला 25 वर्षानंतर परिवर्तन

त्रिवेणी तुंगार या मागील पंचवार्षिकला भाजपच्या तिकिटावर बिनविरोध नगरसेविका झाल्या होत्या. नगराध्यक्ष पदासाठी त्यांची भाजपकडे दावेदारी होती. मात्र, वेळेवर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाने विशेषत: मंत्री दादा भुसे यांनी स्वतः त्रिवेणी तुंगार यांना बळ दिले. दुसरीकडे राष्ट्रवादी (अ.प.)चे आ. हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी तळ ठोकून रणनीती आखल्याने चांगल्या जागा मिळाल्या. मागच्या पंचवार्षिकला नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्षासह 14 नगरसेवक होते. यावेळी नगराध्यक्ष आणि 6 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाने मिळविले आहेत. राष्ट्रवादी (अ.प.) गटाने 8 नगरसेवक, तर भाजपने 6 जागा मिळविल्या. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची जागा व दोन नगरसेवकांची लढविली मात्र, त्यांचा विशेष प्रभाव दिसून आला नाही. राष्ट्रवादी (श.प.) आणि शिवसेना उबाठा यांनी एकही जागा लढविली नाही.

दुसर्‍यांदा मतमोजणी

प्रभाग 2 चे दुसरे मतदान यंत्र बिघडल्यामुळे नगराध्यक्ष आणि प्रभाग 2 मधील निकाल देण्यास उशीर लागला. नाशिक येथून तंत्रज्ञ आले व त्यांनी मतदान यंत्र सुरू केले. मात्र पराभूत उमेदवाराने पुन्हा मोजणीचा आग्रह धरला. अखेर यंत्र उघडून मोजणी करण्यात आली.

कैलास घुले यांनी भाजपच्या चिन्हावर सन 1997 मध्ये तेव्हाचे सर्वमान्य नेतृत्व (स्व.) यादवराव तुंगार यांचा पराभव केला होता. (स्व.) धनंजय तुंगार यांनी 2012 च्या निवडणुकीत कैलास घुले यांचा पराभव केला होता. त्रिवेणी तुंगार या यादवराव यांच्या परिवारातील आहेत. त्यांनी यावेळी कैलास घुले यांचा पराभव केला आहे.

संपतराव सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

धनशक्ती विरुद्ध झालेला हा जनशक्तीचा विजय आहे. नागरिकांनी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला आहे. आम्ही तो व्यर्थ जाऊ देणार नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणालाही बेघर अथवा बेरोजगार, विस्थापित होऊ देणार नाही.

त्रिवेणी तुंगार, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news