Nashik | आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उइके आज नाशिकमध्ये

उइके यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम
Tribal Development Minister Dr. Ashok Uike
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उइकेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उइके सोमवारी (दि. 16) नाशिक दौर्‍यावर येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल येथे होणार्‍या आश्रमशाळा प्रवेशोत्सवासह इतर कार्यक्रमाला डॉ. उइके यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत

Tribal Development Minister Dr. Ashok Uike
Nashik News | बिर्‍हाडचे वादळ आज धडकणार

मुंढेगाव एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल येथे सकाळी 9.30 वाजता डॉ. उइके यांचे आगमन होईल. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम हाेईल. त्यानंतर 11 वाजता डिजिटल एन्व्हायर्नमेंट क्लासरूमचे उद्घाटन होईल. या क्लासरूममधून ते नाशिक, ठाणे विभागांतील सर्व, तर अमरावती विभागातील 68 शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. 12.20 वाजता राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव सोहळा होईल. प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या प्रचार, प्रसिद्धीचा प्रारंभ डॉ. वुईके यांच्या हस्ते होणार आहे. 1 वाजता शबरी वित्त व विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना वाहनवाटप करण्यात येणार आहे. 2 वाजता डॉ. उइके हे विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजन करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news