

नाशिक : आदिवासी विकास विभागात खासगी कंपनीमार्फत शिक्षक नियुक्तीला कंत्राटी शिक्षकांकडून विरोध होत असून 1791 शिक्षकांची भरती रद्द करावी या मागणीसाठी सोग्रस फाट्यावरुन निघालेला बिर्हाड मोर्चा सोमवार (दि.१६) आदिवासी आयुक्तालयावर धडकणार आहे.
सोमवारी (दि.16) रोजी दुपारी 4 वाजता आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत बिर्हाड मोर्चाला रोखण्यासाठी निर्णय होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोर्चाने रविवारी (दि.15) रात्री ओझर येथील जनार्दन स्वामी मठात मुक्काम केला.
आदिवासी विकास विभागाने खासगी कंपनीमार्फत शिक्षक नियुक्तीचा घेतलेला निर्णय कंत्राटी शिक्षकांच्या मुळावर येणारा ठरला आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील कंत्राटी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील शासकीय, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये 1,791 शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 21 मे 2025 रोजी तब्बल 84 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीला हिरवा कंदील दाखवला. मात्र, या नियुक्त्या खासगी कंपनीमार्फत करण्याच्या निर्णयाने कंत्राटी शिक्षकांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली. सरकारच्या या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी राज्य रोजंदारी वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. शासनाकडून आम्हाला भरती रद्द केल्याचे पत्र मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा थेट इशारा संघटनेच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला दिला आहे.
सोग्रस फाटा येथून शुक्रवारी निघालेला हा मोर्चा रविवार (दि.15) ओझर येथे मुक्कामी होता. या मोर्चात सहभागी शिक्षकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी एचएएल गेट क्र. 3 येथील पोलिस चौकी अर्धा तास बंद करून आपली नाराजी दर्शवली. आम्ही वर्षानुवर्षे आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, पण आता आमचेच भविष्य अंधारात आहे, अशी खंत एका कंत्राटी शिक्षकाने व्यक्त केली.
आमच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही बिर्हाडचा पर्याय स्विकारला आहे. आम्हाला प्रवासात अनंत अडचणी आल्या, पावसाने आमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पाऊस आमचा रस्ता रोखू शकत नाही, असे मोर्चेकर्यांनी स्पष्ट केले. मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ सोमवारी (दि.16) आयुक्तांशी चर्चा करणार असून, त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का याकडे कंत्राटी शिक्षकांचे डोळे लागले आहेत.
--------------------------------
फोटो : बिर्हाड मोर्चा नावाने फोटो सेव्ह केला आहे.
फोटोओळी :
--------------------------