

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्री गणेश सार्वजनिक मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी (दि. २५) शहरातील मुख्य मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, विहितगाव, देवळाली गाव, आयटीआय पूल, सातपूर व आनंदवल्ली - चांदशी येथील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मार्गांवरील वाहतूक शुक्रवारी (दि. २५) सकाळी ९ पासून मिरवणूक संपेपर्यंत बदलण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी ही अधिसूचना जारी केली असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य विसर्जन मिरवणूक बुधवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, काठे गल्ली, अशोकस्तंभ आदी मार्गाने पुढे जाणार असल्याने मिरवणुकीच्या मार्गावर तसेच परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या काळात मिरवणुकीतील वाहने, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांना या निबंधातून सूट राहणार आहे.
मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मार्ग
वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरुवात होऊन जुना रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, काठे गल्ली, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, टिळक रोड, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मखमलाबाद चौक, रामकुंड असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. या संपूर्ण मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीस निर्बंध राहतील.
या मार्गांवर प्रवेशबंदी
सीबीएस सिग्नल ते अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका या मार्गावर दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच वाकडी बारव चौक ते अशोकस्तंभ या मार्गावरही वाहतूक बंद राहणार आहे. म्हसरूळ चौक ते अशोकस्तंभ जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक, काठे गल्ली चौक ते गणेशवाडी या मार्गावरील वाहतूक आणि खडकाळी सिग्नल ते दूधबाजार चौक या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
मिरवणुकीमुळे बंद होणाऱ्या मार्गांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, कॉलेज रोड, अशोकस्तंभ आदी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. सीबीएसकडून मुंबई नाका, नाशिकरोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका असा मार्ग राहणार आहे. तसेच सीबीएसकडून द्वारकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका, वडाळा नाका, द्वारका सर्कल हा पर्यायी मार्ग राहणार आहे.
आयटीआय पूल, सातपूर, दत्तमंदिर चौक
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय पूल ते दत्तमंदिर चौक या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्रिमुर्ती चौक, सिडको, खुटवडनगर, कामटवाडे, माऊली लॉन्स परिसरातील सार्वजनिक, खासगी तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन शुक्रवारी (दि. २५) होणार आहे. त्या अनुषंगाने आयटीआय पूल ते गाडगे पेट्रोलपंप, दत्तमंदिर चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मार्ग बंद
१) त्रिमुर्ती चौक ते दत्तमंदिर चौक येथील गाडगे पेट्रोलपांपासून आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
२) आयटीआय पुलाकडून गाडगे पेट्रोलपंप, दत्तमंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग
१) त्रिमुर्ती चौक - मोगलनगर - सिटी भवन - आयटीआय पूल मार्गे वाहतूक सुरू राहील.
२) आयटीआय पूल - सिटी भवन कार्यालयासमोरून - मोगलनगर - त्रिमुर्ती चौकाकडे वाहतूक वळविण्यात येईल.
१. नाशिककरांनो लक्ष द्या! २५ सप्टेंबरला 'या' मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी; गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत बदल
२. विसर्जन मिरवणुकीसाठी नाशिक पोलीस अॅक्शन मोडमध्ये; सीबीएस ते पंचवटी वाहतूक मार्गात मोठे बदल
३. वाकडी बारव ते रामकुंड! असा असेल नाशिक शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग
४. घरून निघण्यापूर्वी हे वाचा! नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी 'हे' असतील पर्यायी मार्ग
५. सातपूर, सिडको अन् आयटीआय पूल परिसरात शुक्रवारी वाहतूक वळवली; पाहा नवी नियमावली
६. रुग्णवाहिका अन् आपत्कालीन वाहनांना सूट; विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस प्रशासनाची महत्त्वाची अधिसूचना
७. नाशिक रोड ते पंचवटी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन
८. सीबीएस, अशोकस्तंभ अन् रविवार कारंजा बंद; जाणून घ्या नाशिकमधील बंद रस्ते आणि डायव्हर्जन
९. अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणूक: नाशिक शहरातील 'या' मार्गांवर सकाळी ९ वाजेपासून वाहनांना बंदी
१०. त्रिमुर्ती चौक ते दत्तमंदिर मार्ग बंद; सिडको आणि सातपूर परिसरातील वाहनधारकांसाठी 'हे' आहेत पर्यायी मार्ग
Nashik Traffic Diversion Ganesh Visarjan, Nashik Traffic Police Rules September 25, Visarjan Procession Route Nashik, Ashok Stambhar Sunday Karanja Traffic Closed, ITI Pool Satpur Traffic Diversion Nashik
nashik-traffic-diversion-announced-for-ganesh-visarjan-procession-check-routes