

जानोरी ( नाशिक ) : दिंडोरी तालुक्यातील सोनगाव शिवारातील विहिरीत मायलेकींचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोनगावच्या पोलिसपाटील कविता कडाळी यांनी दिंडोरी पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार, बुधवारी (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लक्ष्मण पुंजा भारस्कर यांच्या शेतातील विहिरीत स्थानिक महिला सुगंधा सोमनाथ कडाळी (28) आणि तिची मुलगी नेहा (2) यांचा मृतदेह निदर्शनास आला.
बालिका आईच्या कमरेला स्कार्फच्या सहाय्याने बांधलेल्या अवस्थेत असल्याने ही जीवनयात्रा संपविली की घातपात याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. एस. पवार हे घटनेची चौकशी करीत आहेत.