Nashik | नगरसूलमध्ये महावितरणच्या कारभारामुळे शाळेला मनस्ताप

Nashik | नगरसूलमध्ये महावितरणच्या कारभारामुळे शाळेला मनस्ताप

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्तीशाळा सौरविजेवर कार्यान्वित असतानाही महावितरणने ८३०० रुपयांचे वीजबिल देत शाळेवर कारवाईचा इशारा दिला आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेने २०११ मध्ये मीटर कनेक्शन घेतले होते. वीजबिल थकल्याने ग्रामपंचायतीने ते २०१९ मध्ये भरत कायमस्वरूपी कनेक्शन बंद केले होते. त्यानंतर २०२१-२०२२ मध्ये ग्रामपंचायतीने नगरसूलच्या शाळेला सौरपॅनेल बसवून शाळा प्रकाशमान केली. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शाळेला २०२२-२३ मीटर पाठविले, परंतु सौरऊर्जेमुळे शाळेने ते पुन्हा पाठवून दिले. शाळेत वीजमीटर नसतानाही तब्बल एक वर्षानंतर महावितरणने ८३०० रुपयांचे बिल पाठविले. याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता नरेंद्र भोये यांना विचारले असता याबाबत आपण प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.

नगरसूल : शाळेच्या भिंतीवर कोणतेही मीटर नसतानाही शाळेला आठ हजारांचे आलेले वीजबिल. (छाया : भाऊलाल कुडके)
नगरसूल : शाळेच्या भिंतीवर कोणतेही मीटर नसतानाही शाळेला आठ हजारांचे आलेले वीजबिल. (छाया : भाऊलाल कुडके)

ग्रामपंचायतीने आमच्या शाळेला स्वतंत्र सौरऊर्जेचे संच दिल्याने आम्ही महावितरणकडून वीज घेत नाही. महावितरणचे कोणतेही मीटर नसताना शाळेला मोठ्या रकमेचे बिल आले आहे. हे पूर्णपणे अन्यायकारी आहे. -दत्तू नागरे, मुख्याध्यापक, नगरसूल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news