नाशिक : ऐन सण - उत्सवांमध्ये खाद्यतेलासह खोबरं, चनाडाळीचे दर गगनाला भिडले

Edible Oil Price Hike : खाद्यतेल, खोबरे, चनादाळीचे दर भडकले
Edible Oil Price Hike
खाद्यतेल, खोबरे, चनादाळीचे दर भडकलेpudhari news network
Published on
Updated on

नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील किराणा मालाच्या वस्तुंनी महागाईचा कळस गाठला आहे. दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्यांनी वाढ झाली असून, तेल, साखर, शेंगदाणे, चणादाळ यांच्या दरवाढीने गृहीणींचे बजेट कोलमडले असून, ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईने चिंता वाढली आहे. (During the festive season, the budget collapsed. There was a 10 to 15 percent price hike)

गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात उपवासाचे पदार्थ, विविध प्रकारचे मिष्टान्न बनविण्यासाठी किराणा मालाच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. साखर, तेल, रवा, बेसन, खारीक, खोबरे, साबुदाणा, शेंगदाणे अशा विविध प्रकारच्या जीवनाश्यक वस्तु खरेदीसाठी गृहिणींची बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र याचवेळी खाद्यतेल, खोबरे, नारळ, चनादाळ, बेसन पोहे यांच्या किंमतीत सरासरी 10 टक्के दरवाढ झाली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात महागाईच्या झटक्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

Edible Oil Price Hike
ग्राहकहो महिन्याचे बजेट सांभाळा! फोडणी महागली ; खाद्यतेलाचे दर भडकले

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट आली आहे. आवक कमी झालेली असताना अचानक मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत काही घाऊक व्यापार्‍यांनी किंमती वाढण्याच्या अपेक्षेने किराणा मालाची साठवणूक केल्याच्या तक्रारीही किरकोळ व्यापार्‍यांकडून करण्यात येत आहे. याचा परिणाम वस्तुंच्या किंमती वाढण्यावर होत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Hike price
ऑगस्ट - सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये वाढलेले भावpudhari news network

आयातशुक्ल वाढल्याने तेलाच्या दरात वाढ

ऐन सणासुदीच्या काळात 14 सप्टेंबरपासून आयातशुल्कात 12.5 वरुन 32.5 करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम किराणा मालाच्या वस्तुंवर होत आहे. सणासुदीच्या काळात हे आयातशुल्क कमी करावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news