नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024: सकाळी 7 वाजता मतदान सुरू

नाशिकमध्ये चार उमेदवारांमध्ये चुरस; मतदानाला सुरुवात
Voting for graduate and teacher constituencies
शिक्षक मतदारसंघासाठी आज होणार मतदानfile photo

नाशिक : ऑनलाईन डेस्क - नाशिकमध्ये सकाळी ७ वाजता मतदान सुरु झालेले आहे. येथील मतदारसंघात ६३ केंद्र आणि ९० बूथ मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. तर सुमारे ६९ हजार शिक्षक मतदार यंदाचा आमदार कोण होणार हे ठरवणार आहेत.

Summary
  • नाशिकमध्ये संदीप गुळवे - ठाकरे गट,

  • किशोर दराडे - शिंदे गट,

  • ॲड. महेन्द्र भावसार - अजित दादा गट ,

  • विवेक कोल्हे - अपक्ष यांच्यात नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक पार पडत आहे.

नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात

नाशिकमध्ये सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. ६३ केंद्र आणि ९० बूथ केंद्रावर मतदान होत आहे. ६९ हजार शिक्षक मतदार आपला आमदार निश्चित करणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे – ठाकरे गट, किशोर दराडे – शिंदे गट, ॲड. महेन्द्र भावसार – अजित दादा गट, विवेक कोल्हे – अपक्ष यांच्यात लढत होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातील उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झालेली पहावयास मिळत आहे.

तसेच धुळे जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रांवर देखील मतदान प्रक्रिया सुरु झालेली आहे. येथे ८ हजार शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान करण्यासाठी शिक्षकांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news