Nashik TCS Case Bail | "टीसीएस प्रकरणाला वेगळे वळण! पुणे एचआर अश्विनी चेनानी आणि दानिश शेखला जामीन मंजूर"

Nashik TCS Case Bail | टीसीएस प्रकरणात आणखी दोघांना जामीन
Suspects granted bail
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात पुणे येथील टीसीएसच्या एचआर विभागातील अश्विनी चेनानी आणि नाशिकमधील दानिश शेख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Suspects granted bail
ZP Scholarship Exam | "गतवर्षी केवळ 23 % निकाल! चौथी अन् सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय"

पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणार नसल्याच्या अटीवर न्यायालयाने दोघांना जामीन दिला आहे. मात्र, दानिश शेख याच्याविरोधात इतर गुन्हेही दाखल असल्याने त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही.

त्यामुळे या प्रकरणात जामीन मंजूर होऊनही त्याची कारागृहातून तातडीने सुटका होणार नसून त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. न्यायालयाने यापूर्वी या प्रकरणातील अन्य आरोपी निदा खान आणि तहसील अख्तरला जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका झाली आहे.

Suspects granted bail
MSRTC Bus Leaking |"एसटीतही छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ!नाशिक-करंजुल बसमधील दयनीय अवस्थेवर प्रवाशांचा संताप"

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. तपासादरम्यान पीडित महिला कर्मचाऱ्यांनी या घटनांची माहिती वेळोवेळी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील एचआर विभागाच्या अश्विनी चेनानी यांना दिली होती.

मात्र, संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांनी तिला अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news