Nashik bribery case | ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक

५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक
Nashik bribery case
Nashik bribery case
Published on
Updated on

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई मंडळ अधिकारी योगिता आनंद भोंये (वय ३८) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार (दि.५) सायंकाळच्या सुमारास सोग्रस येथे करण्यात आली.

खडकओझर येथील वडिलोपार्जित जमिनीच्या ताब्याबाबत न्यायालयीन वाद सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदारांना रेकॉर्ड व कब्जाबाबत कारवाई करण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी योगिता भोये यांनी तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यात तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

Nashik bribery case
Nashik Crime | नामांकित कंपनीतील धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरण : ५ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी (दि. ५) दुपारी सापळा रचण्यात आला. साडेचारच्या सुमारास सोग्रस येथे रक्कम घेताना मंडळ अधिकारी योगिता भोये यांना अटक करण्यात आली.

Nashik bribery case
Ashok Kharat |अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलिस कोठडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news