नाशिक: धनगर आरक्षण शासन निर्णयावर विरोध करण्यासाठी व आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणार्या प्रवृत्तींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आदिवासी संघटनांतर्फे आज (दि. 20) लाक्षणिक निदर्शने करणार आहे.
उपोषणात आदिवासी रावण साम्राज्य, आदिवासी उलगुलान सेना, रावण युवा फाउंडेशन, आदिवासी आदिम सेना, राघोजी भांगरे बिग्रेड, आदिम वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आदिवासी शक्ती सेना, बिरसा बिग्रेड, आदिवासी बचाव अभियान आदी संघटना सहभागी होणार आहेत.