नाशिक : सुलभा आहेर यांचा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिक : सुलभा आहेर यांचा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा
Published on
Updated on

देवळा(जि. नाशिक) ; देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा भाजपच्या सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तनानुसार आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिका-यांकडे नुकताच दिला.

आहेर यांनी राजीनामा दिल्यानंतर देवळा येथे पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायती मध्ये १७ पैकी १५ जागा भाजपने मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले होते. त्यानुसार आपणास आवर्तनानुसार नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला होता. आपल्या कार्यकाळात आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा नेते केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीस भरघोस निधी मिळवून दिला. त्यात १ कोटी रुपये किमतीची अग्नीशामकचे अद्यावत असे वाहन, सार्वजनिक बांधकाम खात्याची जुन्या तहसीलची जागा नगरपंचायतीच्या इमारतीसाठी शासनाकडून वर्ग करून याठिकाणी भव्य अशी नूतन इमारत उभारणी कामी १० कोटींचा निधी मंजूर करून घेतला असून, देवळा शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना जी रामेश्वर धरणातून नव्याने घेण्यात येणार आहे तिची स्थगिती उठवून नव्याने लवकरच तिच्या कामास सुरुवात होऊन शहरातील पाणी पुरवठा मुबलक करण्याकामी प्रयत्न केले असून, घन कचराच्या माध्यमातून आधुनिक मशिनरींद्वारे खत प्रकल्पास लवकरच सुरुवात करून या खताच्या विक्रीतून नगर पंचायतीच्या उत्पनात नव्याने वाढ होणार आहे. शहरातील उप नगरांमध्ये जल निस्सारण, मल निस्सारण योजना मार्गी लावण्यात आली असून त्याची अमंलबजावणी लवकरच होणार आहे .

मी व माझे पती जितेंद्र आहेर आम्ही दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आल्याने माझे पती यांचे या कामी मला मोठे सहकार्य मिळाले असून, त्यांनी भाजपा नेते केदा आहेर, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यास मदत मिळवून दिली असून माझ्या कारकिर्दीत स्वच्छ देवळा सुंदर देवळा योजनेतून देवळा नगरपंचायतीला महाराष्ट्र शासनाने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून ५ कोटी रुपये दिले. आपला पुढील प्रवास देखील जनतेच्या सेवेसाठी सदैव असाच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news