Nashik Solapur Expressway | GOOD NEWS! 17 तासांचा प्रवासाचा वेळ होणार कमी; नाशिक–सोलापूर–अक्कलकोट सहापदरी ग्रीनफिल्ड मार्गाला मंजुरी

Nashik Solapur Expressway | GOOD NEWS! ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकच्या बांधकामाला मंजुरी दिली.
Nashik-Solapur Six-Lane Highway
Nashik-Solapur Six-Lane Highway
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी (दि. ३१) महाराष्ट्रात ३७४ कि.मी. लांबीच्या सहापदरी GOOD NEWS! ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकच्या बांधकामाला मंजुरी दिली.

Nashik-Solapur Six-Lane Highway
Nashik Municipal Election | नाशिक महापालिका निवडणूक रंगात; 122 जागांसाठी 1532 उमेदवार रिंगणात

बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च १९,१४२ कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नूलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग ६० (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिकजवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल.

चेन्नई बंदराच्या बाजूने, तिरुवल्लर, रेणिगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (७०० कि.मी. लांब) चारपदरी मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित अॅक्सेस - कंट्रोल्ड सहापदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, यामुळे प्रवासाचा वेळ १७ तास आणि प्रवासाचे अंतर २०१ कि.मी. ने कमी होण्याची अपेक्षा आहे.

नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) मार्गामुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसी) नोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक क्षमता सुधारणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्स्प्रेस वेच्या विकासाच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचा आहे.

Nashik-Solapur Six-Lane Highway
Nashik Municipal Election | पंचवटी विभागात छाननीनंतर 392 अर्ज वैध; सहा अर्ज बाद

एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्स्प्रेस वेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी द्रुतगती मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, वाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.

हा सहापदरी अॅक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर क्लोज टोलिंग सुविधेसह असणार आहे. सरासरी ताशी ६० कि.मी. आणि ताशी १०० कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे १७ तासांपर्यंत कमी होईल (३१ तासांवरून ४५ टक्केची घट), तसेच प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाव्यत्यय दळण वळणाची सुविधा उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news