

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील नायगाव शिवारात बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे भीतीचे वातावरण असतानाच बुधवारी (दि.10) नारळाच्या झाडावर बिबट्याचा थरार नागरिकांना बघायला मिळाला.
नायगाव येथून गोदा घाटाकडे जाणार्या रस्त्यावर दिगंबर भागूजी कातकाडे यांच्या शेतातील नारळाच्या झाडांवर बिबट्या असल्याचे परिसरातील शेतकर्यांच्या निदर्शनास आले. बिबट्या बराच वेळ या झाडावर बसून राहिल्याने नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली. बिबट्याचा झाडावरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच परिसरात बघ्यांची तोबा गर्दी उसळली आणि बिबट्याच्या हालचाली वाढल्या.
जमलेल्या नागरिकांच्या आवाजामुळे सुमारे अर्ध्या तासाने बिबट्याने जमिनीवर येण्यासाठी सुरुवात केली. झपाझप नारळाच्या झाडाला पायांनी धरून काही सेकंदात बिबट्याने शेतात उडी घेत पलायन केले.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील पंचाळे शिवारात बिबट्याने चिमुरड्याला ठार केल्याची, तर दुसर्या बालकाला जखमी केल्याची घटना घडली आहे. नायगाव खोर्यात दररोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन घडत आहे. अशातच नारळाच्या झाडावरील बिबट्याचा थरार अनुभवल्याने वाड्या-वस्त्यांवर राहणार्या शेतकरी कुटुंबात भीती निर्माण झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील गोदाकाठचे बागायती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे नायगाव सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आले आहे. गावातील शेतकरी साईनाथ भागूजी कातकाडे यांच्या शिवारात मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या सुारास बिबट्याचा वावर सुरू असून, त्याने त्यांच्या घराजवळील परिसरात धुाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, बिबट्याने कातकाडे यांच्या पाळीव श्वानावर हल्ला ठार केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले असून, गावकर्यांध्ये मोठी भीती पसरली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. नागरिक व शेतकर्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाळीव प्राण्यावर हल्ल्याच्या घटना मागील काही महिन्यांपासून सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत असून, अनेक ठिकाणी पशुधन व पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरीवर्ग व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.