Drinking Water Pipeline | पिण्याच्या पाण्यावरही संकट? गटर आणि जलवाहिनी एकाच चारीत

Drinking Water Pipeline | पांढुर्ली ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता : पिण्याच्या पाण्याची वाहिनी आणि गटर एकाच चारीत; ५ किमी पाईपलाईन गायब असल्याचा धक्कादायक प्रकार
Drinking Water Pipeline
Drinking Water PipelinePudhari
Published on
Updated on

सिन्नर : संदीप भोर

पांढुर्ली ग्रामपंचायतीतील आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेच्या चौकशीत आता पाणीपुरवठा योजनेतील गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, सिन्नर यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या तांत्रिक पाहणी अहवालात गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

Drinking Water Pipeline
महागाईचे आव्हान

विशेष म्हणजे, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी आणि भूमिगत गटाराची पाईपलाईन अनेक ठिकाणी एकाच चारीत टाकण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले असून, त्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

पांढुर्ली येथील दत्तात्रय उत्तम केदार यांनी केलेल्या ऑनलाइन तक्रारीनंतर पंचायत समितीच्या पत्रानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली.

या वेळी तक्रारदार, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीची हस्तांतरण नोंद, अभिलेख आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करण्यात आली.एकाच चारीत गटर व जलवाहिनी तांत्रिकदृष्ट्या ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अहवालात म्हटले असून, भविष्यात पाणीपुरवठा पाईपलाईनला गळती झाल्यास गटारातील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

कामाच्या दर्जाची तपासणीच होऊ शकली नाही

तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यासाठी पाईपलाईनची खोली, दर्जा आणि दर्जानुसार काम झाले का याची खात्री करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चाचणी खड्डे घेणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीने पाहणी पथकाला आवश्यक चाचणी खड्डे करून दिले नाहीत. त्यामुळे पाईपलाईन किती खोलीवर टाकण्यात आली, दर्जा कसा आहे आणि तांत्रिक निकषांचे पालन झाले की नाही, याची खात्री करता आली नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Drinking Water Pipeline
Ratnagiri News : पाणी जपा, टंचाई टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जवळपास पाच किमी जलवाहिनी गायब!

तपासणीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हस्तांतरण टिपणीत नमूद करण्यात आलेली पाईपलाईनची लांबी आणि प्रत्यक्ष मोजमाप यात मोठा फरक आढळला. अहवालानुसार हस्तांतरण नोंदीत पाईपलाईनची लांबी ११,८२४ मीटर नमूद आहे. मात्र प्रत्यक्ष मोजमापात ती केवळ ७,००२.७० मीटर आढळून आली. म्हणजेच सुमारे ४,८२१ मीटरचा फरक आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, हस्तांतरण नोंदी आणि प्रत्यक्ष कामामध्ये गंभीर तफावत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news